श्रीरामपूर मध्ये बौद्ध तरुणांवर झालेल्या अत्याचार विरोधात आर पी आय ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा एल्गार.. श्रीरामपूर मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश.
श्रीरामपूर - साखर कामगार हॉस्पिटलमध्ये मारहाण झालेल्या चार मुलांना भेटीसाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु दीपक भाऊ निकाळजे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते आले होते यावेळी शासकीय विश्रागृहावर याठिकाणी पत्रकारांशी बोलताना दीपक भाऊ निकाळजे म्हणाले की, पीडित मुलांपैकी काही मुले मातंग समाजातील व काही मुले बौद्ध समाजातील आहेत मात्र एकाच मुलाच्या नावानं बाहेर दाखल केलेले असून हे सरळ चुकीचे आहे त्यामुळे प्रत्येक मुलाच्या फिर्यादीनुसार नवीन तक्रार दाखल करणे गरजेचे आहे सदर अन्याय झालेल्या मुलांच्या नावाने 1) कुणाल देविदास मगर 2) शुभम विजय मागाडे 3)ओम अशोक गायकवाड 4) प्रणय अरविंद खंडागळे या 4 मुलांच्या फिर्यादीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची माध्यमातून हक्क आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत आणि कायदा आमच्या बापाचा आहे कायदा आमच्या बापाने लिहून ठेवला आहे आम्ही शांत आहे मात्र आमच्या शांततेचा कोणी अंत पाहू नये....