बौद्ध धम्म परिषद उलवे कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न ..आंतरराष्ट्रीय भंते भदंत बा डाविटो यांची उपस्थिती


  उलवे रायगड - १९ऑगस्ट २०२३रोजी  बौद्ध धम्म परिषद कार्यालयाचे उलवे येथे उद्घाटन झाले. आयु. आदरणीय रामराव देवरे सर(सेवानिवृत्त मुख्याध्यापक)यांच्या हस्ते हा सोहळा झाला. आणि या सोहळ्यास आशिर्वाद देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भंते वंदनीय भदंत बा डाविटौ तसेच वंदनीय भदंत बोधानंद थेरो,वंदनीय भदंत पुर्ण हे लाभले. तीनही भन्तेंचे आगमन होताच आपल्या बौद्ध भगिनींनी त्यांच्या मार्गावर पुष्प पाकळ्यांची पखरण आणि वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. आणि कार्यालया पर्यंत घेऊन आले. फित कापून उद् घाटन झाल्या नंतर त्यांना आदराने कार्यालयात आसनस्थ केले.  त्यानंतर आयु. नरेश कांबळे (उपाध्यक्ष)यांनी सुत्रसंचालन करून सगळे विधी यथायोग्य पार पाडले. त्यानंतर भदंत बोधानंद थेरो यांनी धम्म देसना दिली. नंतर आयु. बाबुराव इंगळे (मार्गदर्शक)आयु. नरेश राऊत साहेब(कोषाध्यक्ष)मी स्वतः वामन वाघमारे(अध्यक्ष)आयु. विजय हबळे  (उप कोषाध्यक्ष)आयु. विनिता बर्फे मॅडम(को.क.सदस्य)आयु. वनिता कांबळे (सचिव)यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी सरणत्तेय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. तद्नंतर आयु. शुभांगी लाळे (उप कोषाध्यक्ष) यांनी भन्तेंना दैनंदिन वापरायच्या वस्तूंचे धम्मदान दिले.व नंतर तीनही भन्तेंना कृतज्ञ भावनेने निरोप दिला. याकामी आयु.विश्वकांत लोकरे (मार्गदर्शक) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
        या अशा अभुतपूर्व सोहळ्यास सर्व धम्म बंधू भगिनींनी उपस्थित राहून जो प्रतिसाद दिला तोही अभुतपूर्व असा आमच्या अपेक्षे पेक्षा जास्त होता त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी आणि कोअर कमिटी सदस्य खूप उत्साहीत झालो आहोत असाच सहकार्याचा प्रतिसाद आपण धम्म परिषदेत ही दाखवून द्या आणि आपल्या सोबत आपले नातलग,सगेसोयरे,आपतेष्ट,मित्रमंडळी यांनाही सहभागी करून घेऊन आपली धम्म परिषद यशस्वी करण्या करिता हातभार लावावा असे अध्यक्ष महोदय यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..