सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा



न्यूयॉर्क - अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्ससारखे 15 ते 30 सेकंदांचे छोटे व्हिडिओ सातत्याने पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. प्रयोग कार्यशाळेतील अभ्यासानुसार, सतत अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहिल्याने मेंदू अल्पकालीन आणि तात्पुरत्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय लावून घेतो.

१५ ते ३० सेकंदाचे छोटे व्हिडिओज पाहिल्यामुळे छोटी तात्पुरती स्मरणशक्ती निर्मितीचा प्रादुर्भाव - संशोधकांना असे आढळून आणले आहे की या छोट्या व्हिडिओंमुळे माणसाचे लक्ष फक्त क्षणभर केंद्रित राहते. परिणामी, प्रदीर्घ वाचन किंवा खोल विचार करण्याची क्षमता कमी होते. एकाग्रता आणि गंभीर चिंतनासाठी लागणाऱ्या सवयी विकसित होत नाहीत, ज्याचा परिणाम शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनावरही होऊ शकतो.

लहान मुलांना सर्वात जास्त धोका - विशेषतः लहान मुलांवर या प्रकारच्या व्हिडिओंचा मोठा परिणाम होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांमध्ये लहान मुले वारंवार यूट्यूब शॉर्ट्स आणि रिल्स पाहिल्याने त्यांच्या मेंदूने केवळ तात्पुरती माहिती साठवण्याचा कल दाखवला. त्यामुळे दीर्घकालीन स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

मानसोपचार तज्ञ डॉक्टर व वैज्ञानिकांचा सावधानतेचा इशारा- यामुळे मानसोपचार तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी सतत लहान व्हिडिओ पाहणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. प्रदीर्घ काळ याचा वापर केल्यास व्यक्तीची विचार करण्याची क्षमता आणि स्थिर लक्ष केंद्रित करण्याची सवय कमी होऊ शकते. त्यामुळे पालकांनी आणि तरुणांनी यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्सचा अतिरेकी वापर टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

लेखक संपादक - प्रतिक यादव 
ईमेल - newsnowpage@gmail.com

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.