सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती
नवी मुंबई – कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने सुनीलदादा पारकर आणि सहकारी यांच्याकडून आज नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चिकनेश्वर उद्यानातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात शौचालयाची उभारणी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ओपन जिमसाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता आणि दररोज दोन सुरक्षारक्षक नेमणे ही प्रमुख मागणी करण्यात आली. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबत उद्यानातील वाढत्या वापराची, नागरीकांच्या सुरक्षिततेची आणि सार्वजनिक सुविधांच्या गरजेची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्यानाचा दौरा करताना नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचाही अहवाल महापालिकेला दिला. आयुक्तांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
या भेटीदरम्यान श्री.सुनिलदादा पारकर साहेब, श्री.अभिजीत बापूराव काकडे,श्री.विकास विठ्ठल शिंदे श्री.अमित हांडे ,श्रीमती.हुरूनिशा खान मॅडम, श्री.प्रभुकोरे,
श्री.विशाल शुक्ला,श्री.युवराज लोखंडे,श्री.किरण चिकणे
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment