आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण


वाशी नवी मुंबई | २१ जून २०२५ –(प्रतिक यादव) 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक यांनी एकत्र येत नागरिकांसमवेत योग साधना केली आणि उत्तम आरोग्यासाठी मिळून योगा करून योग जनजागृती संदेश दिला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महापालिका उपायुक्त डॉ. अजय गडदे , अभिलाषा म्हात्रे आणि स्मिता काळे यांनी केले होते.

वनमंत्री गणेश नाईक आणि डॉ कैलास शिंदे प्रशासक यांचा संयुक्त योगा 

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी दोन योग साधक यांनी मिळून करण्यात येणाऱ्या योगा प्रकारात मिळून विविध योग आसने केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली आणि नवी मुंबईतील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.


आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती

कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते, जिथे स्थानिक आमदार मा. मंदाताई म्हात्रे यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी साडी परिधान करून या कार्यक्रमास उपस्थिती लावून योगा केला त्यामुळे योगा करण्यासाठी इच्छा आणि महत्त्वाकांक्षा गरजेची असते हा संदेश जनमानसात पसरला.

हजारो नवी मुंबईकरांची हजेरी

सकाळच्या सत्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात शेकडो महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच हजारो नागरिक सहभागी झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, सर्वांनी एकत्र येत योग साधना करून आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता वाढली असून, आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याचा संदेशही दिला गेला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने यशस्वीरित्या पार पाडली.

या योग सत्राद्वारे “yoga for one Earth..One Health” या संकल्पनेला अनुसरून, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचा प्रभावी मार्ग म्हणून प्रचार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..