डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ
(पत्रकार प्रतिक यादव रजिस्टर/मुंबई ९८२१६९३०७०/ प्रत्यक्षदर्शी अनुभवातून लिहिलेला लेख)
नेरूळ - नवी मुंबईतील आरोग्य क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. संजय तारळेकर ते नवी मुंबईतील पहिले हृदय विकार तज्ञ (कार्डियोलॉजिस्ट) असून, गेली तीन दशके आपल्या सेवाभावी वृत्तीने हजारो रुग्णांचे जीवन सुखी व निरोगी केले आहे.
नेरूळमधील 'शुश्रुषा' हॉस्पिटलची स्थापना
डॉ. तारळेकर यांनी नेरूळमध्ये 'शुश्रुषा हॉस्पिटल' ची स्थापना करून नवी मुंबईतील आरोग्य सेवेला नवा आयाम दिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी तज्ञांच्या मदतीने हृदय विकारांवरील उपचार, शस्त्रक्रिया आणि तातडीच्या सेवा येथे उपलब्ध आहेत. रुग्णांची काळजी आणि त्यांच्या आरोग्याचे जतन हेच हॉस्पिटलचे ध्येय आहे.
उच्च शिक्षण व आंतरराष्ट्रीय सन्मान
डॉ. संजय तारळेकर हे उच्च विद्या विभूषित डॉक्टर आहेत. त्यांनी देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांमधून हृदय विकार तंत्रज्ञान व उपचार पद्धतींचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पनवेल प्रांतातील नवा आरोग्य सेवेसाठी प्रकल्प
नवी मुंबईनंतर आता पनवेल प्रांतातही डॉ. संजय तारळेकर नवीन हॉस्पिटलची उभारणी करत आहेत. या प्रकल्पाद्वारे परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि किफायतशीर आरोग्य सेवा मिळणार आहे.
समाजसेवा व सरकारी योजनांचा लाभ
डॉ. तारळेकर हे केवळ एक डॉक्टरच नाहीत, तर समाजसेवी व्यक्तिमत्त्वही आहेत. त्यांनी अनेक सरकारी योजनांच्या माध्यमातून मोफत हृदय सेवा दिली आहे. विशेषतः आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्यांनी अनेक शिबिरे आणि आरोग्य तपासणी मोहीमा राबवल्या आहेत.
देशातील आरोग्य सेवेला नवा आयाम
डॉ. संजय तारळेकर यांचा जीवनप्रवास फक्त वैद्यकीय सेवेतच सीमित नसून, त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वही जपले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नवी मुंबई व पनवेल क्षेत्रातील हजारो रुग्णांना जीवनाची नवी दिशा मिळाली आहे.
Comments
Post a Comment