नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी आणि अँटी टेररिस्ट स्क्वाड कडून मुंबईत छापा हस्तकाला अटक
मुंबई - राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सदैव कार्यरत असणाऱ्या एटीएस आणि एनआयए कडून सध्या महाराष्ट्रात धापेमारी केली जात आहे. त्यातच आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली. आयएसआयशी संबध असल्या प्रकरणी अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. अकीब नाचन याला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
यापूर्वी पाच जणांना एनआयएने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. भिवंडीतील पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीब नाचन याने आर्थिक मदत केल्याचा दावा एनआयएने केला आहे. त्यामुळे अकीब नाचन याच्या घरावर एनआयएने छापेमारी करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.
Comments
Post a Comment