Breaking News Buldhana शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्क मागणीसाठी जिल्हा परिषद आवारात विद्यार्थी सोबत आलेल्या पालकांवर प्रशासनाकडुन गंभीर गुन्हे दाखल


बुलढाणा -(बातमीदार PN) एकीकडे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहु नये यासाठी प्रशासन कार्यरत असतांनाच माटरगाव, ता.खामगाव ,जिल्हा बुलढाणा येथील शाळेच्या दुरावस्था बद्दल , व शिक्षकच्या मागणी करीता , दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन द्यावे या मागणी करीता विद्यार्थी आपल्या पालकांसह जि.प.कार्यालय बुलढाणा येथे आले असता प्रशासनाने विद्यार्थ्यांना चिखल असलेल्या जागेत तब्बल तीन तास बसवले विद्यार्थी यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत सोळा वर्ष आतील विद्यार्थी यांना प्रशासनाने पिण्याचे पाणी सुद्धा वेळेवर उपलब्ध करुन दिले नाही, शेवटी पालकांनी पुढाकार घेऊन पाणी कॅन विकत आणुन तहानलेल्या विद्यार्थी यांना पाणी दिले गेले, तसेच जेवणासाठी तरी विद्यार्थी यानी कार्यालय पॅसेज वा छताखाली बसुन जेवण करु द्या, बाहेर उघड्यावर जेवल्यास पाऊस आल्यावर आमच्या जेवणात पाणी पडेल अशी विनंती केल्यावर सुद्धा प्रशासनाने विद्यार्थ्यांना जेवणासाठी छताखाली येऊ दिले नाही. परिणामस्वरूप विद्यार्थ्यांना पावसाळी वातावरणात उघड्यावर जेवण करावे लागले अशा प्रकारे प्रशासनाने विद्यार्थ्यांना सापत्न वागणुक दिली, अशातच एका विद्यार्थीनीची तब्येत खालावली असता सदर विद्यार्थींनीस तरी कार्यालय परिसरात प्राथमिक उपचार करीता येऊ द्या अशी मागणी पालकांनी केली तर प्रशासनाने स्पष्ट नकार दिला.. 
परिणामी पालकांनी विद्यार्थींनीस उचलून छताखाली नेत असतांना प्रशासन द्वारा पोलीस बळाचा वापर करण्यात आला, अशा प्रकारे प्रशासना द्वारा देण्यात येणाऱ्या वागणुकीचा निषेध म्हणून पालकांनी व विद्यार्थ्यांनी प्रशासन विरोधी नारे बाजी केली, आमच्या विरोधी नारेबाजी केली याचा द्वेष मनात ठेऊन प्रशासनाने सोबत आलेल्या पालकांवर , तसेच सत्याग्रह शेतकरी संघटना राष्ट्रीय संयोजक कैलास वसंतराव फाटे यांच्यासह तब्बल 11 पालकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले, परिणामस्वरूप संपूर्ण जिल्ह्यात विद्यार्थीं , पालक वर्ग, व शैक्षणिक सुधारणा करीता कार्यरत कार्यकर्ता यांच्या मध्ये प्रशासन विरोधी नाराजी निर्माण झाली आहे, अशा असंवेदनशील अधिकारी यांना शासनाने तत्काळ कायमस्वरुपी शासकीय सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी जिल्ह्यातील सजग नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.