बौद्ध धम्म परिषद उलवे नोड कार्यालयाचे येत्या शनिवारी उद्घाटन


उलवे नवी मुंबई - रायगड प्रांतात नव्यानेच निवासी वसाहत झालेल्या उलवे रोड परिसरामध्ये येत्या शनिवारी दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी बौद्ध धम्म परिषद उलवे रोड नवी मुंबईच्या कार्यालयाचे उद्घाटन आयोजित करण्याचे ठरवलेले आहे आणि या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष करून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भदंत बा डावीटो यांना निमंत्रण केलेले आहे आणि त्यांनी या कार्यक्रमास येण्यासाठी देखील इच्छा प्रकट केलेली आहे. भदंत बा डावीटो हे कंबोडिया या राष्ट्रातून भारतामध्ये आलेले आहेत व त्यांच्याच जोडीला वंदनीय भंते बोदानंद थेरो तसेच भदंत पूर्ण हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कंबोडिया येथील भदंत बोदानंद थेरो तसेच भदंत पूर्ण हे आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय रामराव देवरे हे आहेत. उलवे सेक्टर 20 प्लॉट नंबर 100 येथील श्रीजी सोसायटी मध्ये शॉप नंबर पाच मध्ये बुद्ध धम्म परिषद च्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.  कार्यकारणी समितीचे अध्यक्ष वामनदादा वाघमारे व इतर समिती या सर्वांनी  शनिवारी बौद्ध धम्म परिषद च्या कार्यालय उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबई नवी मुंबई रायगड तसेच नजीकच्या प्रांतातील सर्व बौद्ध बांधव व बहुजन तसेच बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे सर्व नागरिकांना भारतीयांना निमंत्रण दिलेले आहे तरी आपण सर्वांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे अध्यक्ष तर्फे आग्रहाचे निमंत्रण सर्वांना दिले जात आहे. 
                            भविष्यात रायगड प्रांतात प्रथमता आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदे च्या कार्यक्रमास सर्व नागरिक व नेतेमंडळी यांचे लक्ष लागून राहिले आहे येणाऱ्या काळात हा कार्यक्रम आपणा सर्वास पाहायला मिळेल असे मार्गदर्शक आयु. विश्वकात लोकरे आयु बाबुराव इंगळे तसेच बौद्ध धम्म परिषद कोर कमिटि यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील समाजसेवक प्रतीक यादव आणि सुदत्त खरात यांनी देखील या कार्यक्रमासाठी शेकडोंच्या संख्येने नवी मुंबईतील बौद्ध बांधवांना आमंत्रित करण्याचे वचन घेतलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..