प्रतिक्रांतीनंतरची समाज व्यवस्था - काय आहेत दिनकर सोनकांबळे यांचे विचार वाचा पुढीप्रमाणे
मुंबई - (लेखक दिनकर सोनकांबळे ) प्रतिक्रांती नंतर फक्त चार गटात जनतेची विभागणी केली होती. ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र( हिंदू) (म्हणून जाहीर पने बोलत शूद्रांना वेदांच्या मत्रांचा अधिकार नाही), यामुळे आजही हिंदू कडे वैदिकांचे वेद, मनुस्मृती, पुराणे असे साहित्य आढळून येत नाही. आज ज्या जाती निर्माण झालेल्या दिसत आहेत त्या खूप अलीकडील आहेत जसजसा प्रतिकार वाढत गेला जागृती होत गेली, तसतशी फूट पाडत गेले, व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या याचा परिणाम असा झाला की स्थान, भाषा आणि व्यवसाय वाचक समूह जात वाचक बनले. ज्यांनी बुद्ध धम्म सोडला नाही त्यांना हिन, बहिष्कृत, अस्पृश्य बनविले..आज जे हिंदू आहेत ते एकवळेचे सर्व बौद्ध आहेत. ही बाब या देशातील ब्राम्हण जाणून आहेत..म्हणून त्यांनी अनेक हिंदूच्या (शुद्रांच्या) राज्याभिषेकाला विरोध केला. त्यांच्यावर जाचक अटी लादल्या. त्यात भोसले घराणे असेल..होळकर घराणे असेल..शिंदे/ गायकवाड घराणे असेल. हुन, डच पोर्तुगीज ब्रिटिश मुघल यांच्याशी संगनमत करून हिंदू राजांना संपविले. आजचा हिंदू युवक सज्ञान झाला तरी जोखड झुगारून टाकताना दिसत नाही. उलट तो या दलदलीत फसत चालला आहे. आपल्याच बंधू विरोधात वैदिकांचा चमचा बनून कार्य करतांना दिसत आहे.
( लेखक दिनकर सोनकांबळे समाजशास्त्र अर्थशास्त्र व स्थापत्यशास्त्र याचे अभ्यासक व संशोधक आहेत )
Comments
Post a Comment