राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईतून सोशल मीडिया सेल या विभागात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी श्री. तेजस उत्तम फणसे यांची नियुक्ती.

पुणे - पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया फ्रंट विभागातर्फे सोशल मीडियाचे एक दिवसीय शिबिर दिनांक २० ऑगस्ट, २०२३ रोजी घेण्यात आले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरद पवार साहेब, खा. श्रीनिवास पाटील साहेब, प्रांताध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते जितेंद्रजी आव्हाड, युवा नेते रोहित दादा पवार या सर्व मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये माझी सोशल मीडिया सेल विभाग - महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. जयंतजी पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया विभाग राज्यप्रमुख श्री. महादेव बालगुडे साहेब व कार्याध्यक्ष मा. मोहसिन शेख यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी नक्कीच येणाऱ्या काळात अतिशय विश्वासाने आणि प्रामाणिक पणे पार पाडेन. या शिबिरासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी शिबिराचे आयोजन सोशल मीडिया फ्रंट चे श्री. महादेव बालगुडे, मा. मोहसीन शेख तसेच संपूर्ण टीम यांच्या योगदानामुळे राज्यभरातला सोशल मीडियाचा पहिला उपक्रम यशस्वी झाला. 


Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..