काय आहे मणिपूरच सत्य वाचा लेखात पुढील प्रमाणे - पूजा प्रकाश एन
मुंबई महाराष्ट्र- निसर्ग रम्य पहाड़ी भागाने व्यापलेलं मणिपुर नैसर्गिक विविध संसाधनानी नटलेलं मणिपुर, सर्व जन गुण्यागोविंदाने राहत असतांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये मैतेइ समूहास आरक्षण दिल्या नंतर आरक्षण का व कोणाला? या प्रश्नांना घेऊन, मुलनिवासी कोण? मुलनिवासी यांना सुविधा दिल्या अशा अपप्रचाराची राळ उठवून नागा, मैतेइ,आणि कूकी या समूहामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या यंत्रणानी जो चुकीचा प्रचार करून मणिपुर पेटवलं , या देशविघातक कृत्य करणारयानी आपल्या देशाची अंतरराष्ट्रीय स्तरावर पत कमी होऊन नामुष्की चे शिक्के आपणास लागतील याचा जरा ही विचार केला नाही, राज्याच्या अंतर्गत सुरक्षास न जुमानता, कायद्याची पर्वा न करता माणुसकी तत्ववाद यास पायदळी तुडवून या देशातील येणाऱ्या पीढी साठी "एक काळा कुकर्म इतिहास" निर्माण केला अशा यास कारणभूत ठरणाऱ्या त्या सर्व घटकांचा भारतीय म्हणुन प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी निषेधच करायला हवा,मणिपूरमधील मूळ भारतीयांना हक्क देण्यास सुरुवात केली आहे, या गोष्टीचा विरोधकांना राग आला आहे. मणिपूर गेली कित्येक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होता. मणिपूर हिंसाचारावर सर्व विरोधी पक्ष भारत सरकारची बदनामी करत आहेत. मणिपूरचा हिंसाचार भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे असे सामान्य लोकांना संभ्रमित करणारे हे संदेश पसरवणारे लोक मूळ विषयाला बगल देऊन 'प्रोपोगंडा' करून लोकात गोंधळ उडवून देण्यात माहीर आहेत. त्यात त्यांना अडचणीच्या असणाऱ्या बाबी ते 'खुबीने' सांगत नाहीत. उदा. मैतेइ हे आदिवासी आहेत, हे सांगताना ते म्हणतात की, 'मणिपूरचे मूळ रहिवासी मैतेइ आदिवासी आहेत. स्वातंत्र्यापूर्वी मणिपूरच्या राजांमध्ये भयंकर युद्धे झाली, अनेक दुर्बल मैतेइ राजांनी शेजारील म्यानमारमधून मोठ्या संख्येने कुकी आणि रोहिंग्या हल्लेखोरांना युद्धात आपल्या सैन्यात बोलावले आणि परदेशी रोहिंग्या आणि कुकी यांच्यात मिसळून लढले.' हे फॉरवर्ड पाठवणारे ही गोष्ट लपवून ठेवतात की, माणिपूरचे मैतेइच तिथले मूळ रहिवासी असतील, तर त्यांचा कुकी, नागा आणि अन्य तीसेक जमातींचा 'वांशिक गट' एकच अर्थात 'मंगोल' आहे. मणिपूरचे मैतेइ जर आदिवासी आहेत, तर मग ते हिंदूधर्मीय कसे? आदिवासी हिंदू नसतात. मैतेइ आदिवासी असतील तर मैतेइ मध्ये जाती कुठून आल्या? आदिवासी मैतेइच्यामध्ये बामोन (ब्राह्मण) सर्वश्रेष्ठ कसे? जगभरातील इतर आदिवासी जमातींमध्ये जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था नाही, मग आदिवासी असलेल्या एकट्या मैतेइच्या मध्ये वर्ण आणि जातीव्यवस्था कुठून आली? मैतेइमध्ये सवर्ण,ओबीसी,दलित कसे? मणिपूरमध्ये जातींवर आधारित आरक्षण कसे? मैतेइमधील अनेक जाती ख्रिश्चन झालेल्या आहेत, तर त्यांना आरक्षण कोणत्या आधारावर दिले जाते? पांगल म्हटले जाणारे मुस्लिम मैतेइच्यामध्ये कुठून आले? सनामाही म्हणून वेगळी ओळख जपलेले जे निसर्गपूजक मैतेइ आहेत, त्यांचं काय? म्यानमारमध्ये जे मैतेइ आहेत, त्यांना तिकडे 'कथे' म्हणतात आणि बांगला देशात जे मैतेइ आहेत, त्यांना 'बामोन' किंवा 'कथे पोन्ना' म्हणतात. त्यांना भविष्यात मणिपूरमध्ये आणण्याचा काही 'प्लॅन' आहे का?
मणिपुरी म्हणजेच मैतेइ आणि मैतेइ म्हणजेच मणिपुरी अशी मैतेइची स्वतःची ओळख आहे शिवाय त्यांची भाषा ही मणिपुरी वा मैतेइ म्हणून ओळखली जाते. या भाषेला स्वतःची लिपी असून ती केंद्राच्या सूचीत समाविष्ट आहे, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांत त्याचा सर्वाधिक फायदा मैतेइना झालेला आहे की नाही? मणिपूर राज्यातील मैतेइ तर आदिवासींची ओळख ही मणिपुरी अशी नसते. ती मणिपुरी कुकी, नागा वा अन्य अशी असते. ती का?मणिपूर राज्यातील समाजात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आहे.मणिपूर खोऱ्यात व्यापार, तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार त्याच पाहतात. पुरुष कुकी लोकांमध्ये मुलाला मामाच्या मुलीशी विवाह करावा लागतो. तसेच वराला वधूच्या घरी जाऊन रहावे लागते व त्या कुटुंबातील कामाचा भार उचलावा लागतो. अशीच प्रथा इतरही काही उपजमातीमध्ये आढळते.ज्या देशात स्त्री ला देवता चा दर्जा दिला जातो तीचं पुजन केलं जातं, त्याचं देशातील एका राज्यात स्त्री ला विवस्त्र करुन तीला जाहीररीत्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवलं जातं, काय म्हणावं याला, या अशा कृत्याचा अभिमान आपण बाळगावा का? एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगातही महाभारतातल्या सभेतल्या द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा रस्त्यावर आणली जातेय. टिकली, साडी आणि डोक्यावरून महिलेचा पदर ढळला म्हणून व्याकूळ होणारे संस्कृतीरक्षकही गप्प आहेत. महाभारताच्या त्या सभेतही रथी, महारथी गप्प होते. स्त्री देहाची विटंबना होताना गप्प बसण्याची परंपरा खूप जुनी आहेच व गप्प बसणार्या शास्त्यांचा पराभव अटळ असतो.
शत्रूपक्षाच्या,आपल्याहून वेगळ्या धर्माच्या स्त्रीला सन्मानानं परत पाठवण्याची छत्रपती शिवरायांची कृती सद्गुणविकृती ज्यांना वाटते आणि शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर अतिप्रसंग करायला हवेत,असे विचार जे मांडतात त्या विचारांच्या वारसदारांकडून कोणत्याही प्रतिक्रियेची,निषेधाची अपेक्षाच नाही.
आज तुम्ही शांत राहू शकत नाही. पुरुषांच्या जमावानं वेढलेल्या त्या निर्वस्त्र महिलांसाठी आज बोलावं लागेल. जात, धर्म, भाषा, प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणानं माणसालाच माणुसघाणं बनवलंय. मणिपूरच्या महिलांना घेरून नाचणारा जमाव तुमच्या आजूबाजूला सुद्धा तयार झालाय. त्या सर्वांना जाऊन सांगा की अस्मिता आणि द्वेषाच्या राजकारणानं देशाच्या जनतेला कशाप्रकारे या जमावात सामील केलंय. त्या ‘मणिपूर’च्या महिला नाहीयेत. त्या कुकी महिला नाहीयेत. त्या फक्त "महिला" आहेत. महिलेला जातीपाती,धर्माच्या महिला ही अशी ओळख न करता या देशात महिलांची "फक्त महिला" म्हणून ओळख या देशात करण्यास आपण सक्षम ठरणार आहोत का? जर ही घटना तुम्हाला अस्वस्थ करत नसेल,यानं तुमचं शरीर कंप पावत नसेल तर तुम्ही स्वतःला मृत घोषित करून टाका. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यात शांततेचं आवाहन केलेलं नाही. तिथं जाऊन द्वेष आणि हिंसा रोखण्याचं आवाहन केलेलं नाही. सरकारनं त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. त्यांच्या जाण्यानं किंवा आवाहनानं हिंसा थांबलीच असती याची काही गॅरंटी नाही. पण या चुप्पीचा काय अर्थ आहे? या चुप्पीचं समर्थन केलं जाऊ शकतं? पण प्रधानमंत्री परदेश दौऱ्यात मश्गुल होते, निवडणूक यंत्रणेत गर्क होते. सत्ता आल्यानंतर मित्रपक्षांना धुडकावलेल्यांना गोंजारत होते. जळणाऱ्या मणिपूरपेक्षा हे सारं त्यांना महत्वाचं वाटत होतं.
सत्ता म्हणजे अधिकार आणि मत्ता म्हणजे पैसे हे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडं समाजाचं लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल असं त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होते. मुलं बेफाम बनतात. हे सगळं नक्की कशामुळं घडलं याचा सखोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचंच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारचं! याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं.जी वासनाकांडं गेल्या काही दिवसात मणिपुरात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. जे काही विकृत लोक अशा वासनकांडात गुंतलेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाजानं पुढाकार घ्यायला हवाय. स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल.
महिलेला निर्वस्त्र करून तिची धिंड काढून बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशा नराधमांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. अत्याचारी पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रातून येतात पण हे ही घडणं म्हणजेच मानवतेला कलंक लागणचं आहे, हे घडलचं नाही पाहीजे अशी "स्त्री पुरुष समन्वय संस्कृती" आपणास नव्याने निर्माण करावी लागेल, येणाऱ्या काळात या देशाला विश्व गुरु / महासत्ता बनवायचं असेल तर जाती भेद, धर्म भेद, वांशिकवाद विसर्जन करुन मानवताप्रेमी दृष्टिकोण इथल्या नवपीढीच्या सुख समृद्धि करीता आपणास तयार करावा लागेल.
कुकी आणि इतर जमाती आदिवासी आहेत..की हिंदू, खिश्चन,बौद्ध की आणखी कोणी..त्यांचा दोष इतकाच आहे की ते पर्वतीय जंगलात राहतात आणि त्यांच्या जमिनीच्या पोटात खजिना दडलाय.....
वन कायदे बदलून आदिवासींचे जगण्याचे अधिकार संपवले की त्यांना जंगलं सोडून पळवायला मोकळे..
आपण मुख्य प्रवाहातील खेडी शहरात राहणाऱ्या लोकांनी हा पर्वतीय भारतात जगलेला संपन्न झालेला मुलनिवासी भारतीय आदिवासी तेथेच आपल्या मूळ क्षेत्रात राहिला पाहिजे असा आग्रह तरी धरू शकतो ना ???
मुख्य म्हणजे हे का घडलं ? तर सर्वोच्च न्यायालय ने मैतैइ ना आरक्षण दिलं आणि नंतर मणिपुर कस उद्धवस्त होतय हे आपण बघत आहोत, याला जबाबदार कोण? कधी याचा विचार आपण करणार का, सर्व जण गुण्यागोविंदाने राहत असतांना मध्येच कधी गुर्जर आरक्षण, कधी मराठा आरक्षण, कधी पटेल आरक्षण, कधी जाट आरक्षण, तर कधी मध्येच अंतर्गत जातीतील आरक्षणाची मागणी होते, व त्यामधुन एकोप्याने राहणारे आपण अचानक दुरावतो,फक्त दुरावतचं नाही तर ऐकमेकांचे जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पाहत नाही कोण घडवतं हे? भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत,अशी प्रार्थना म्हणणारे आपण एवढे पराकोटीच्या द्वेषावर कसे पोचतो,हाच का आपल्या राष्ट्रीयत्वाचा आपणास अभिमान ? हे सर्व ज्या आरक्षणामुळे घडते त्या आरक्षणाशिवाय आपणास आपल्या देशात सर्वजनांच्या प्रगतीचे दरवाजे "समन्यायी" तत्त्वावर खुले करता येतील का? हिंसा व द्वेषमुलक तत्वाधान नाकारून "स्वातंत्र्य-समता-बंधुत्व" या त्रय सुत्रीवर राष्ट्र निर्माण करुन राष्ट्राची उभारणी करुन सर्व जनांना समृद्धि प्रदान कशी करता येईल याचा विचार या देशातील राष्ट्र प्रेमी नागरिकांनी करुन समृद्ध,स्वंयपुर्ण,स्वंयप्रकाशीत व शांतिप्रिय राष्ट्र निर्माण करीता कार्यरत व्हायला हवं तेव्हाच आपण येणार्या पिढीसाठी सृजनात्मक भारत निर्माण करू शकु.
Comments
Post a Comment