फॅशन डिझायनिंग स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये सुदत्त खरात यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.
सानपाडा नवी मुंबई - आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी फॅशन डिझायनिंग आणि ट्रेनिंग क्षेत्रातील नावाजलेली कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था ॲपेरल ट्रेनिंग सेंटर च्या सानपाडा विभागातील ट्रेनिंग सेंटर येथे समाजसेवक सुदत्त खरात आणी प्रतिक यादव यांनी फॅशन डिझाईनिंग चा कोर्स करणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन करून फॅशन क्षेत्रातील स्कोप व करिअर या विषयावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे उद्योजक मरचेंडायजर सुदत्त खरात यांची प्रिय बहिण Vaishali Sandeep Salvi यांनी 2006 साली याच संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन मेहनत करून मर्चंटडायसिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून स्वतःचे स्थान बनवले त्याचप्रमाणे माणिकचंद उद्योग समूहाचा पुणे येथील संपूर्ण बंगल्याचे मरचेनडायजिंग देखील आमच्या वैशाली ताईनेच केले होते तसेच वैशालीताईचे ऍडमिशन हे स्वतः सुदत्त खरात यांनी केले होते या त्यांच्या जुन्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला.
प्रसंगी उपस्थित सर्व तरुण-तरुणी विद्यार्थी यांनी प्रेरित होऊन स्वतःचे नाव देखील वैशालीताई प्रमाणेच उज्वल करण्याचे आश्वासन दिले प्रसंगी या संस्थेचे मुख्याध्यापक यांचे समाजसेवक सुदत्त खरात व प्रतीक यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment