पंतप्रधान मोदी यांना पुणे येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचे मोठं योगदान असल्यामुळे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. खुद्द महात्मा गांधी यांनी टिळकांना आधुनिक भारताचं महानायक म्हटलं होतं. आज देशाला लोकमान्यांचे विचार प्रेरणादायी आहेत, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी( 1 ऑगस्ट) पुणे येथे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला.

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही कसर मी सोडणार नाही. शिवाय पुरस्कारासाठी जी एक लाखाची रक्कम मिळाली आहे ती नमामि गंगे या प्रकल्पाला अर्पण करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. टिळकांनी सुरु केेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती आदी उत्सवाचाही त्यांनी उल्लेख केला. दगडूशेठ पहिले व्यक्ती होते ज्यांनी टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केल्याचाही उल्लेख मोदींनी केला.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..