15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालिका मुख्यालयावर तिरंगा रोषणाई
पाम बीच नवी मुंबई - काल दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयावरती तिरंगा रोषणाई करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी नवी मुंबई प्रांतातील लाखो नागरिकांनी पाम बीच रोड या ठिकाणी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला. प्रत्येक भारतीय सण उत्सवाच्या निमित्ताने पालिका मुख्यालयावर रोषणाई करून हे उत्सव साजरे केले जातात त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील विशेष तिरंगा रोषणाई करण्यात आली होती. लाखो नवी मुंबईकरांनी या ठिकाणी उपस्थिती लावून स्वातंत्र्य दिन साजरा केला तसेच सोशल मीडियावर पालिका मुख्यालयाचे फोटोज व्हिडिओज रिल्स टाकून संपूर्ण वातावरण तिरंगामय करून टाकले.
Comments
Post a Comment