रासायनिक दूषित पाणी सोडल्यामुळे तळोजा येथे बकऱ्यांचा मृत्यू पशू व मानवी जीवन झाले धोकादायक

तळोजा पनवेल - तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीमध्ये रासायनिक पाणी सोडल्यामुळे नावडा येथील शेतकऱ्याच्या 8 बकऱ्या दगावल्या आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिली आहे. नावडे गावातील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या होत्या.कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे हे न्यायालयीन लढा लढत आहेत. प्रदूषणाबाबत आठ जुलै रोजी त्यांनी ईमेल केले होते, जर योग्य कारवाई झाली असती तर शेतकऱ्याच्या बकऱ्या मरण पावल्या नसत्या, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कासाडी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला तरी चालेल मी मागे हटणार नाही, असा इशाराही माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.