नवी मुंबई पालिका अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचा निर्णय



नवी मुंबई - मागील ब-याच वर्षांपासून प्रलंबित असलेले नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, बदली असे विविध प्रश्न मार्गी लावण्याकडे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून आज 7 संवर्गातील आणखी 69 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

      यामध्ये अधिक्षक पदावर 24, वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक पदावर 26, लेखाधिकारी पदावर 2, सहाय्यक लेखाधिकारी पदावर 4, उपलेखापाल पदावर 7, आरोग्य सहाय्यक महिला पदावर 6, सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी पदावर 6 अशाप्रकारे 7 संवर्गात 69 महापालिका कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.

      मागील दोन वर्षात 45 संवर्गातील 348 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली असून आता पदोन्नती लाभलेल्या कर्मचा-यांची संख्या 417 इतकी झालेली आहे. सुरूवातीला पहिल्या टप्प्यात चतुर्थ व तृतीय श्रेणीतील कर्मचारी यांच्या पदोन्नतीवर लक्ष केंद्रीत करून त्यानंतर इतरही श्रेणीतील कर्मचा-यांना पदोन्नती देऊन सर्व घटकांतील कर्मचा-यांना त्यांचा हक्काचा लाभ देण्यात येत आहे.

      आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय दृष्टीकोनाबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारीवृंदामध्ये संतोषाचे वातावरण असून याचा सकारात्मक परिणाम अधिक चांगले काम करण्यात परावर्तित होताना दिसून येत आहे.   

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारीकर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींमधील अडचणी दूर करून त्यांना योग्य लाभ मिळावा या भूमिकेतून काम करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी महापालिका प्रशासन विभागास दिलेले असून त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमसुजाता ढोले नियंत्रणाखालीप्रशासन विभागाचे उपआयुक्त श्रीशरद पवार आणि आस्थापना विभाग प्रत्येक कर्मचा-याला त्याचे न्याय्य हक्क मिळतील अशाप्रकारे कटीबध्दतेने काम करीत आहे


Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..