नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

नवी मुंबई -  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवात साजरा होणारा असल्याचे महत्व लक्षात घेत आयकॉनिक वास्तू म्हणून नावलौकिक असणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात आज भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त  महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ यांचेसह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यालय इमारतीला केलेल्या नयनरम्य तिरंगी विद्युत रोषणाईमुळे भव्यतम मुख्यालय इमारतीच्या आकर्षणात भर पडलेली असून नागरिक मित्र, परिवारासह एकत्र येऊन तिरंगी झळाळी असलेल्या मुख्यालय वास्तुसोबत तसेच आतमध्ये ठेवलेल्या सेल्फी पॉईंटवर उत्साहाने छायाचित्रे काढताना दिसत आहेत. 16 ऑगस्टपर्यंत ही रोषणाई बघता येणार आहे.

याशिवाय पावसाळी कालावधीत फडकविला न जाणारा मुख्यालय इमारतीसमोरील उंच व भव्यतम स्वरूपातील प्रतिकात्मक राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घरोघरी तिरंगा मोहीमेच्या अनुषंगाने फडकविण्यात आला असून हे देखील नागरिकांचे विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने या परिसराला भेट देत राष्ट्रप्रेम जागवित आहेत.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.