कंजंक्टिवाईटीस आजाराच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांची काळजी घेण्याविषयक नवी मुंबई पालिकेचे आवाहन.
नवी मुंबई- राज्यात इतर भागाप्रमाणे (नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात) कंजंक्टिवाईटीस हा डोळयांचा आजार सर्वत्र दिसत आहे. कंजंक्टिवाईटीस विषांणूंमुळे, रोगजीवाणूंमुळे, परागकण किंवा धूर किंवा धुळीसारखे ॲलर्जीकरणांमुळे होतो. हा पावसळयात पसरतो आणि लहान मुलांमध्ये व प्रौढांमध्ये तो संसर्गजन्य असतो. डोळयाचा विषाणूजन्य संसर्ग मुख्यत्वये ॲडिनो वायरस मुळे होतो. सध्या न.मुं.म.पा रुग्णालयात कंजक्टिव्हाटीस चे रुग्ण नेहमी पेक्षा जास्त प्रणात आढळून येत आहेत.
कंजंक्टिवाईटीस लक्षणे-
· श्लेष्मल निघणारे, लाल आणि सुजलेले डोळे
· पाणालेले डोळे
· बोचरी संवेदना
· खाज, जळजळ, दाह
· पापण्या किंवा पापण्यांवरच्या केसांवर रखरखीत थर जमा होणे
कंजंक्टिवाईटीस आजार कसा पसरतो?
कंजंक्टिवाईटीस हा संसर्गजन्य आजार असुन दुषित रुग्णांपासुन त्यांच्या सहवासातील व्यक्तीमध्ये ऐकमेकांच्या वापरात येणाऱ्या दुषित झालेल्या वस्तु जसे रुमाल, बेडशीट, चादर, उशी इत्यादी व्दारे होण्याचा धोका असतो.
कंजंक्टिवाईटीस व (डोळे आल्यास) काय काळजी घ्यावी?
· डोळयांना स्वच्छ पाण्याने धुवा.
· इतर व्यक्तिंच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
· डोळयानां सतत स्पर्श करु नये.
· उन्हात वापरण्यासाठी असणा-या चष्म्यांचा वापर करवा.
· आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कच-यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळयाची साथ पसरवतात.
· डॉक्टरांच्या सल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी.
· शक्य असेल तर घरी थांबणे व लहान मुले बाधित झाल्यास शाळेत किंवा बाहेर पाठवू नये.
· गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
हा आजार सौम्य स्वरुपाचा असुन नागरीकांनी घाबरुन जाऊ नये व योग्य सल्ला आणि काळजी घेऊन या आजाराचा बचाव करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment