महिला आरक्षण विधेयकाची तत्काल अमंलबजावणी करुन, संसदीय लोकशाहीत भारताने जगात आदर्श निर्माण करावा - ॲड . पुजा प्रकाश एन.
पुणे - यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:। ज्या देशामध्ये अनादी काला पासून स्त्री महिमा गायल्या जातो, स्त्री चे मोठेपण स्विकार करण्यासाठी स्त्री महात्म्य वर्णिलं जातं, मातृसत्तात्मक संस्कृति चे ऐतिहासिक दाखले ज्या भूमि मध्ये अभ्यास क्रमात समाविष्ट असतात, मातृसत्तात्मक पद्धती चे मोठेपण स्विकार करुण स्त्री ला विद्येची देवता, घराची करुणा, व जन निर्मीतीचा अविष्कार समजलं जातं, त्याच भूमीत मध्ययुगीन कालात स्त्री वर्गावर अन्याय अत्याचार वाढतात,तीचं महात्म्य नाकारुण स्त्री शक्ति ला, मातृशक्ति ला दास्यत्वात ढकललं जात या दास्यत्वात ढकलून कर्मीक बंधनात अडकवून स्वातंत्र्य हिरासत गुलाम म्हणून हिणवल्या गेलं, या अशा मानवीय समूहास कंलकीत ठरणाऱ्या संस्कृति व साहित्य निर्माण कर्त्याचा निषेध करायला हवा.या मध्ययुगीन कालात भारतीय संस्कृति च्या स्त्री विषयक दृष्टिकोन अन्याय जोर जुल्म असा जबरदस्त असतांना सुद्धा बरयाच स्त्रीयांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा ऐतिहासिक दस्ताऐवजा मध्ये सुवर्णांकींत अक्षरांनी कोरुण...