आरक्षण कोणासाठी व कशासाठी?? - ॲड.पूजा प्रकाश एन.
पुणे - आरक्षण हा भारतातील एक महत्वाचा परंतु वादाचा विषय झाला आहे. आरक्षणामागील मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हे होते. आरक्षणाचा मुद्दा जातीविरुद्ध जाती असा लढण्याचा नाही; तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणाने मांडण्याचा आहे. महाराष्ट्रात मराठा तसे गुजरातमध्ये पटेल, अन्य ठिकाणी जाट अशा बहुसंख्य जाती ज्या सवर्णातील आहेत, त्यांचीही अशीच मागणी आहे आणि विचार होताना सर्वांगीण व्हावा लागेल. न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा संवर्ग मागासलेला म्हटले की तो सदासर्वकाळ मागासलेलाच धरला जावा असे म्हणता येणार नाही. म्हणून त्यांचे होणारे सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उत्थापनही लक्षात घ्यावे लागेल. आजचे वास्तव मात्र असे दिसते की राजकीय लाभ व्हावा म्हणुन नेतेमंडळी तरुणाईची डोके भडकावून हा प्रश्न रस्त्यावर आंदोलन, संप,मोर्चे या माध्यमातून सोडवू इच्छितात. त्याऐवजी हा प्रश्न राजकीय मंडळींनी संसदेच्या व विधानसभा गृहाच्या कनिष्ट व वरिष्ठ अशा दोन्ही प्रकार च्या सभागृहात प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी ने सामोपचाराने विचार मंथन करुन आजपर्यंत सोडवायला पाहिजे होता.. पण आजतागायत असे नेतृत्व या देशात वा राज्यात निर्माण झाले नाही ही महासत्ता होऊन पाहणाऱ्या देशाची शोकांतिका म्हणाव लागेल, आज देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पार करत आहे,आणि या पंच्याहत्तरी च्या सात दशकामध्ये जर आपण या देशातील सामाजिक मागासलेपण दुर करण्यात अपयशी ठरत असु , मागासल्या समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती साधण्यात कमी पडत आहोत, हे कमी की काय म्हणुन एके काळी समृद्ध, धन संपन्न असलेल्या समाजालाही आज वर्तमानात मागासल्या पणाचं जिवन जगाव लागत असेल व त्यांना प्रगतीसाठी आरक्षणासारख्या विशेष बाबीची गरज आज तंत्र ज्ञानाच्या युगात पडत असेल तर आपल्या देशाने नेमकी कोणत्या क्षेत्रात, कशाची, व कोणाकरीता प्रगती केली याचा धांडोळा घ्यावा लागेल. आजही आपणास आपल्या प्रगतीसाठी जर सामाजिक मागासलेपणाचा आधार घ्यावा लागत असेल तर आपण समता-स्वतंत्रता- बंधुत्व व न्याय या तत्वाचा भारत निर्माण करण्यास आपणास अजून किती दशक वा शतके लागतील याचा विचार समाजधुरीनांनी व शिक्षितांनी करायला हवा,
घटनेच्या कलम १४ ने जर समता प्रस्थापित केलेली आहे, तर मग आरक्षण हे भेदभाव करणारे होईल की नाही? मात्र, यावरील उत्तर स्पष्ट असेच होते की समता ही समान व्यक्तींची असते. जर काही सामाजिक वर्गांना असमानेतची वागणूक किंवा असमान संधी दिलेल्या असेल, तर प्रथम त्यांना इतर घटकांच्या बरोबरीत आणले पाहिजे.
या तत्वाचा विसर आजतागायत जे सत्ता धारी व विरोधी म्हणुन संसदीय व विधानसभा गृहामध्ये यांना पडलेला दिसतो, यांना या तत्वाचा विसर पडला नसता तर सामाजिक मागासलेपण असलेला समाज आज प्रगतीच्या शिखरावर मार्गक्रमीत असता व सामाजिक सधन असलेला समाज अधिक प्रगत असता, पण आज वर्तमानात चित्र उलटे दिसत आहे, मागासलेपण असलेला समाज अधिक मागासल्या जात आहे,प्रगती पुर्ण व सधन समाज मागासलेपण सिद्ध करण्यासाठी स्पर्धा करत आहेत परिणामस्वरूप जात विरहीत राष्ट्र निर्माण होऊन समता रुपी सधन नागरी कांच राष्ट्र निर्माण होण्याऐवजी , जातीय समूह असलेलं मागास नागरीकांच राष्ट्र निर्माण होत आहे, असचं राष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न बलिदान केलेल्या राष्ट्र प्रेमी देशभक्तांनी व महाविभूतींनी बघितलं होत का? या साठीचं का त्यांनी आपला देह झिजवला, याचा विचार आपण भारतीय म्हणुन प्राध्यान्याने केला पाहिजे....
आज जरी आपण आरक्षणाकरीता, आपले मागासलेपण सिद्ध करण्यासाठी भांडत असू तरी येणाऱ्या दशकानंतर आपलं राष्ट्र समता,बंधुत्व व न्याय या तत्वाचं राष्ट्र निर्माण करण्याचं ध्येय उराशी बाळगून समताधीष्ठीत, स्वावलंबी, स्वयंप्रकाशीत राष्ट्र निर्माण करीता आरक्षण या तत्वाची राष्ट्र निर्माण कर्त्याची भूमिका समजावून घ्यावी लागेल,
आरक्षणाविषयी साधारणत: १९७० ते २००० या कालावधीत तत्कालीन माध्यमांत सर्वांत जास्त वायरल झालेलं वाक्य म्हणजे, या दलितांनी व आदिवासी यांनी तुमच्या नोकऱ्या पळवल्यात. तुम्ही सरकारी जावई आहात या वाक्याने राज्यातील वातावरण खराब केले ते परत कधीही नीट न होण्यासाठीच. व आताचं नुकतेच सर्वात जास्त वापरण्यात असलेलं वाक्य- ‘मी जातपात मानत नाही, मला जातपात कळत नाही. आरक्षण जातीच्या नव्हे तर आर्थिक आधारावर द्या.’ आणि तिसरं वाक्य- ‘एससी-एसटीचं आरक्षण काढायची हिंमत या सरकारमध्ये नाही. ते काढलं तर ते जिवंत राहणार नाहीत.या अशा विचाराची नागरीकांची संख्या जर वाढत असेल तर भारतीय समाजमनाची,विचारधारेची मोठी हानी होते आहे, आपण अशा विचारांना खतपाणी घालून भरणपोषण करण्याऐवजी आरक्षण का? कशासाठी? कोणाला? हे समजून न घेताच आरक्षणावर बोलणाऱ्या बुद्धि ची किव कराविशी वाटते,
आरक्षण म्हणजे काय?
तर आरक्षण म्हणजे राखीव जागा,
आरक्षणाचे जनक कोण?
जर सामाजिक व्यवस्थेचा आपण नीट अभ्यास केला तर अस लक्षात येईल की,आरक्षणाचां जनक मनु।
किती टक्के आरक्षण तर १००% आरक्षण, कोणासाठी तर फक्त ब्राह्मण प्रवर्गासाठी, ज्या वेळी ब्राह्मण व्यतिरिक्त कोणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता,काहीं ना तर पाणवठ्यावर नैसर्गिक तहान लागल्यावर तहान भागवण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, सर्व अधिकार ब्राह्मणांकडे , ब्राह्मण व्यतिरिक्त कोणालाही ब्र काढण्याचा सुद्धा अधिकार नव्हता याला म्हणायचे सर्व क्षेत्रात असलेले १०० % आरक्षण
नंतरच्या काळात जसजशी ब्राह्मण व्यतिरिक्त सेवाधारी समूहातील काही लोकांना समज येऊ लागली, तसतसे ते नैसर्गिक मानवीय हक्कासाठी जागृत होऊ लागले नैसर्गिक संसाधनावर सर्वाचा समान हक्क आहे ही भावना, समज मानवीय समूहामध्ये रूजू लागली तसतसे त्यामध्ये हिस्सेदारी होत गेली, त्या हिस्सेदारी चा पाझर झिरपत झिरपत येऊन सेवाधारी व दुर्लक्षित मानवीय समूहाकडे येण्याकरीता एकोणीसाव शतक उजाडांव लागलं,तर प्रकर्षाने लाभ घेण्याकरीता विसाव्या शतकात प्रवेश करावा लागला, विसाव्या शतकाच्या उतरार्धापासून आरक्षण कोणाला मिळालं तर मानवीय समूहातील मानवीय नैसर्गिक हक्काची समज ज्या सर्वात खालच्या घटकातील समूहाच्या महानायकास झाली व त्यांनी आपल्या नासमज व नैसर्गिक हक्कांपासून लाखो मैल दुर असणाऱ्या समाज समूहास मिळवून दिले, ते आर्थिक उत्कर्ष व्हावा या करीता नव्हे तर सामाजिक समान संधी मिळावी या महान उद्देशाने, पण आजही जर काही घटकांना सामाजिक मानवीय समान संधी मिळत नसेल तर तो महासत्ता व विश्व गुरु होऊ पाहणाऱ्या राष्ट्राचा अपमान समजावा,
सामाजिक समान संधी मिळावी म्हणून अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती यांना आरक्षण दिल्या गेलं ते एक समाज एक राष्ट्र ही संकल्पना वास्तवात येईपर्यंत ते सामाजिक प्रगती व राजकीय प्रतिनिधीत्व अशा दोन घटकावर आधारित आहे,
राजकीय प्रतिनिधित्व आरक्षण हे दहा वर्षा करीता होतं कारण दहा वर्षामध्ये या घटकाला सर्व समाज स्तरावर समानतेने स्विकार केला जाईल हा दुर्दम्य आशावाद त्या भूमिके मध्ये होता, पण तशा प्रकारचं मानवीय जिवनासाठी समतामूलक वातावरण निर्माण करण्यात येथील राजकीय सामाजिक क्षेत्रातील स्वातंत्र्योत्तर कालखंडातील लोकनेते,समाज सुधारक, राजकीय नेते कमी पडले,
परिणामस्वरूप भारतीय मानवीय समूहामध्ये एक समाज एक राष्ट्र निर्माण होण्याऐवजी, असंख्य तुकडे असलेल्या समाज मनाचं भेद मूलक तत्वाचं राष्ट्र निर्माण होत आहे, हे येणाऱ्या पिढ्यांकरीता खुप धोकादायक असेल, सामाजिक समता निर्माण व्हावी या उद्देशाने दिल्या गेलेलं आरक्षण आज तंत्र ज्ञानाच्या युगातही जस च्या तसं राबवावं लागत आहे, हा आपल्या सर्वासाठी आजही आपण माणसांना माणुस म्हणून स्विकार करत नाहीत याची अक्कल आपणास या युगातही येऊ नये, म्हणजे माणुस म्हणून आपण आजही किती मागास आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे,
सामाजिक समता निर्माण व्हावी या उदात्त हेतु ने दिल्या गेलेलं सामाजिक समान सहभागी तत्वाचं आकलन आपण किमान येत्या दशकात पुर्ण करायला हवं व आधुनिक माणुस म्हणून सर्वांना समानतेने वागवायला हवं तरच महासत्ता राष्ट्राचे महासत्ताधीश नागरिक म्हणून घेण्यासाठी आपण पात्र असू
आर्थिकदृष्ट्या मागासांना (दारिद्र्यरेषेखालील) सर्व मूलभूत गरजा पुरवणं, तसंच त्यांचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पूर्ण होण्यासाठीच्या तरतुदी कलम ४६ व काही तरतुदी कलम ३८ मध्ये उद्धृत आहेतच. त्यासाठी आर्थिक आधारावर आरक्षण मागण्याची गरज तरी काय? तरीही राजकीय नेत्यांकडून तीच री ओढली जात असेल तर दोन गोष्टी नक्की समजाव्यात, एक- यांना आरक्षण या संकल्पनेची जाण नाही, अथवा ते खोटं बोलत आहेत.
आज देशभरातील एससी-एसटी वर्गाला, त्यांच्या सामाजिक मागासलेपणामुळे त्यांना समान प्रतिनिधित्व मिळावं, म्हणून आरक्षण बहाल कलेलं आहे,
व इतर मागास प्रवर्गातील जातींना आर्थिक व शैक्षणिक प्रगती करीता आरक्षण आहे,
इतर मागास प्रवर्गामध्ये समाज मनात उच्च स्थान असलेल्या दैवज्ञ ब्राह्मण या जातीचा सुद्धा समावेश आहे, तेव्हा इतर मागास प्रवर्गात ३५० हून अधिक जातीचा समावेश होतो, हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहीजे,
आज देश भरात विविध जाती आरक्षणाची मागणी करत आहेत, महाराष्ट्रात मराठा धनगर, राजस्थान हरियाणात जाट,गुजरात मध्ये पटेल अशा आरक्षणाच्या जातनिहाय मागण्या सुरुच आहेत, मणिपुर मध्ये आरक्षणाचा निर्णय लागल्यानंतर , आरक्षित नसलेल्या जातीस आरक्षित जातीत समावेश केल्यानंतर काय घडलं हे आपण उघड्या डोळयांनी पाहीले आहे, भारतात साधारणत: ६००० जाती आहेत येणाऱ्या काळात प्रत्येक जात आरक्षण मागु लागली तर देशाचं काय होईल याचा विचार आपण करावा, आणि त्या वेळी या जातींचा समावेश हे राज्यकर्ता लोक अनुसुचित जाती अनुसुचित जमाती इतर मागास प्रवर्तन विमूक्त भटके वा जे जे आरक्षण प्रवर्ग आहेत त्या घटकात करतील व अशा प्रकारे आज जातीय स्वाभिमानी असणारे आपण, आपली भविष्यकाळातील येणारी वंशावळ मात्र सामाजिक मागासवर्गीय म्हणून हिणवल्या जातील, तेव्हा त्यांच सामाजिक स्थान काय असेल याचा विचार आपण करत आहोत का? राजकीय क्षेत्रातील व्यक्ति नी अधिक श्रीमंत व्हायचं जनतेला गरीब करायचं ते गरीब झाले की मग समाजातील शहाण्या लोकांनी जनतेच्या उन्नति करीता लढा उभारायचा आणि मग विकासासाठी लढा उभारणाऱ्या समूहास सामाजिक मागासवर्गीय दर्जा देऊन त्या आपल्या प्रागैतिक हक्कासाठी लढणाऱ्या समूहास कायम स्वरूप मागास दर्जा देणाऱ्या शासक नीतीस आता मातीत गाडण्याची वेळ आली आहे, वेळ पडल्यास अजून वेगळा प्रवर्ग निर्माण करुन त्यांना आरक्षण बहाल करतील व आपल्यात फुट पाडतील राजकीय वर्गाचा हा कावा आपण ओळखला पाहीजे ,इंग्रज निती 'फोडा़ व झोडा आणि राज्य करा' ही नीती आपले म्हणणारे राज्यकर्ता मोठ्या खुबिने आपली सत्ता टिकवण्याकरीता वापरत आहेत हे आपण भारतीय लोकांनी समजून घेतलं पाहीजे,
आरक्षणाची मागणी करणे अयोग्य नाही, पण एके काळी समृद्ध धन संपन्न असलेल्या जातसमूहास आरक्षण मागण्याची वेळ यावी हे दुर्दैवी आहे, देश प्रगतीपथावर जात असतांना समृद्ध असलेले जात समूहाची आर्थिक स्थिति जर मागास होत असेल तर मग देशात प्रगती कशाची होत आहे याचा विचार आपण केला पाहीजे व या अधपतनास जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवला पाहीजे, येणाऱ्या काळात प्रत्येक जाती आर्थिक व सामाजिक मागास होत राहील्या व त्या प्रत्येक जातसमूहांनी आरक्षणाच्या मागणी करीता असेचं आंदोलन केली तर आपला देश एक राष्ट्र एक समाज म्हणून उभा राहण्यासाठी आपण हजारों वर्षाचा कालावधी घेणार आहोत का याचा विचार भारतीय म्हणून आपण सर्वांनी करायला हवा
समृद्धि संपन्न असलेल्या जात समूहावर जर अशी वेळ येत असेल तर आधीच अडगळीत पडुन असलेल्या व आपल्या प्रगती करीता आयुष्यात संघर्ष करणारया जात जमातीचं काय याचांही विचार आपणास करावा लागेल,
समृद्ध व धन संपन्न असलेल्या जात समूहा मध्ये आपण मागास गरीब व असहाय आहोत हे सिद्ध करण्याची ओढ जर या तंत्रज्ञान युगात लागत असेल तर अशी वेळ आपल्यावर कोणी आणली याचा विचार करणे आवश्यक आहे,समृद्ध असलेला वर्ग अधिक समृद्ध व्हायला हवा होता, व मागास असलेला समूह समृद्धतेच्या मार्गावर आरुढ व्हायला हवा होता, पण हे झालं नाही यास दोषी कोण यास दोषी असणाऱ्यांना कडक शासन झालं पाहीजे.
आपण ओघाने बोलत असतो श्रीमंत अधिक श्रीम़ंत होत आहेत तर गरीब अधिक गरीब पण हे खरं नाही वाटत याउट घडत आहे गरीब अधिक गरीब होतचं आहे पण एके काळी श्रीमंत असणारी मध्यमवर्गीय असणारी लोकंही दिवसेंदिवस दारिद्र्य रेषेत येत आहेत, देश महासत्ता विश्व गुरु होत असतांना जर देशात गरीबीचं प्रमाण वाढत असेल व गरीबी वाढल्या कारणाने त्या जातसमूहास मागास ठरवलं जात असेल तर येणाऱ्या पीढी साठी आपण कसं राष्ट्र निर्माण करत आहोत याचा भारतीय नागरिक म्हणून, माणूस म्हणून विचार करा. आज सन्मान प्राप्त प्रतिष्ठा प्राप्त जाती उदया मागास म्हणून हिणवल्या जातील हे असचं होत राहल तर आपल्या वंशावळी ला आपण कसा वारसा देणार आहोत याचा विचार करा, आदरणीय महात्मा फुले,राजश्री शाहु,बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन सामाजिक मागास, धनापासून कोसो मैल दुर असणाऱ्यां दुर्लक्षित जात समूहास सामाजिक समतेने जगता यावं म्हणून आरक्षित कोटा निर्माण केला, त्या समूहांना सन्मानाने वागवून त्यांचा विकासाच्या प्रवाहात आणने ही आपल्या राज्यकर्ता वर्गाची नैतिक जबाबदारी होती ती जबाबदारी पार न पाडता आपले राज्यकर्ता समृद्ध असलेल्या जात समूहास सामाजिक मागास व आर्थिक दारिद्र्य रेषेत ढकलण्याचं पातक करत आहेत, आणि आपण त्या जातसमूहातील जबाबदार नागरिक म्हणून आपला समाज, जात समूहास अधिक सन्मान प्राप्त व्हावा, अधिक धनवान ऐश्वर्य संपन्न व्हावं यासाठी न लढता गेल्या दोन दशकापासुन आम्हाला सामाजिक मागासवर्गीय श्रेणीत टाका यासाठी रात्रंदिवस संघर्ष करत आहोत, लढा उभारत आहोत वा रे माझ्या देशभक्तानो, आपला लढा कशासाठी असला पाहीजे हे सुद्धा आपणास जर अजून कळले नसेल तर आपण आधुनिक तंत्र ज्ञानाच्या ज्ञान, विज्ञानाच्या युगात जगतोय याची लाज वाटायला पाहीजे, असो मराठा, पटेल, गुर्जर, जाट यांनी आपल्या आर्थिक मागास होण्याचा जाब प्रशासन व राज्यकर्ता यांना विचारला पाहीजे व मागासवर्गीय म्हणून जगण्याचा अट्टहास सोडुन जे सामाजिक बहिष्कृत मागासवर्गीय होते त्यांना जातीय द्वेष न करता सन्मानाने सोबत घेऊन आपल्या सर्वांच्या सर्वांगीण उन्नतीचा लढा उभारावा असं आवाहन आपणास करण्यात येते, कारण आज ज्यांना आपण मागासवर्गीय म्हणतो ते एके काळी येथील शासक होते, त्या काळी असलेले शासक, शासक सर्वजनांच्या उन्नती करीता आजच्या शासक वर्गाप्रमाणेच असमर्थ ठरले असतील मग त्या वेळी आज मागासवर्गीय म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या समूहास लढा उभारावा लागला असेल व त्याचा परिपाक म्हणून यांना मागासवर्गीय ठरवल्या गेले ते मागासवर्गीय पण ते आजही सहन करत आहेत, या सामाजिक मागासवर्गीय समूहात सहभागी होण्यासाठी लढा न उभारता एके काळी समृद्ध व ऐश्वर्य संपन्न असलेल्या या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेउन सन्मानाची वागणूक देऊन आपल्या सर्वांच्या सर्वांगीण उन्नति करीता शांततेच्या मार्गाने रणसंग्राम उभा करून, प्रगती च्या दिशेने घौडदौड करुन विना जात प्रवर्ग, विना आरक्षण आपलं राष्ट्र प्रगत करण्यासाठी रचनागामी समताधिष्ठीत, स्वावलंबी, स्वयंपुर्ण, स्वयंप्रकाशीत राष्ट्र निर्माण करुया याचं अपेक्षेने विश्व निर्माता कडे प्रार्थना!
Comments
Post a Comment