भारत भूमि.. तुझ्यातला.. भारत चिरायू होवो - ॲड. पुजा प्रकाश एन.

मुंबई महाराष्ट्र - हिन्दुस्थान आणि इंडिया असे दोन वेगळे देश, विचारधारा या  भूमीत वसतात. या दोन विचारधाराच्या मध्ये ८०% खेडेगावात विस्तारलेला भारतात मात्र दिवसेंदिवस गरीबी, भुकबळी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, या वाढत्या समस्या चं मूळ शोधायचां प्रयत्न केला तर असं दिसत. हिंदुत्व वाद्यानी इंडिया ला सर्व पापाचा धनी मानले आहे.आधुनिक पाश्चात्य मूल्ये , पाश्चात्य विज्ञान , इंग्रजी औषधे , युरोपियन कायदे आणि अमेरिकन कुटुंब पद्धती पेक्षा  सकस आणि अस्सल असे काही  आहे ते हिन्दुस्थानात आहे असा त्यांचा दावा आहे. इंडिया ने युरोपियन बनण्याची खाज सोडून द्यावी असा आग्रह आहे. हिन्दुत्वाचां पुरस्कार आणि इंडिया चा धिक्कार ही राष्ट्रवादाची उजवी बाजू झाली. पण  डावी बाजूही  इंडिया चा द्वेष करण्यात किंचितही कमी नाही. खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण यातून गेल्या वीस वर्षात इंडिया निर्माण झाला आणि हा इंडिया भारताचा शोषक आहे असे डावे मानतात. उजवे भगवे आणि लाल डावे या दोघांचा सामायिक शत्रू "इंडिया" आहे हे नीट समजून घेतले पाहिजे. भांडवलशाही, इंग्रजी भाषिक , नवश्रीमंत , मध्यमवर्गीय हे सारे कम्युनिस्ट विचारानुसार दुष्ट बुर्रज्वा क्याट्यागिरीत येत असतात . चंगळवाद असो की धरणे बांधून केलेला विकास - या नव्या इंडिया ला डावे , कम्युनिस्ट समाजवादी या सार्याचा विरोध आहे. डाव्या उजव्यांच्या मध्ये काँग्रेस किंवा अल्पसंख्य पुरोगामी येतील. डावे उजवे कट्टर असल्याने ते इंडिया चा द्वेष करतील. मधलेही इंडिया वर फारसे प्रेम करत नाहीत. आयडिया ऑफ इंडिया ही संकल्पना पंडित नेहरूंच्या जवळची असली तरी आजच्या काँग्रेसशी त्याचा काहीही संबंध नाही . आजची काँग्रेस ही हायरारकी असलेली पितृसंस्था आहे . ज्यात ग्रामीण अर्थसत्ता ताब्यात ठेवल्या जातात .  काँग्रेस नावाची समृद्ध अडगळ कुणाचा द्वेष करत नाही . पण कुणावर प्रेमही करत नाही . तेव्हडी तिची पात्रता ही नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील हे काँग्रेसी सरंजामदार बदलत्या इंडियाला समजू शकत नाहीत - प्रेम करणे फार दूर राहिले. तर स्वतःस हिन्दुस्थान चे सरंजाम समजणारे भारतीयांच्या गरीबी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या याबद्दल शब्द ही बोलतांना दिसत नाहीत, 

इस्लामवादी तर इंडियाचे पूर्ण द्वेष्टे . समलिंगी लोकांना विरोध करायला आणि जहन्नुम मध्ये धाडायला इस्लमियांनी हिंदूत्व वाद्याच्या सुरात सूर मिसळला होता . आधुनिक कायदा , आधुनिक कपडे , आहार आणि विचाराचे स्वातंत्र्य इंडिया ला हवे असते. इस्लामीयांचा नेमका डूख या विचाराच्या स्वातंत्र्यावर आहे.

भारत म्हणजे विषमता याला आपण प्रेमाने विविधता म्हणतो. या विविधतेस आपण समृद्धि च्या दिशेने घेऊन  जाणार आहोत की नाही हा 'क्ष' प्रश्न आहे,खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण हे नव्या इंडिया चे बाहू आहेत. आणि हेच बाहू विषमतेचा किल्ला फोडू शकतात असा गैरसमज इंडिया वाले बाळगून आहेत, तर धार्मिकता, कटृर धर्मांधता द्वारा या भूमीचा विकास होईल अशी धारणा हिन्दुस्थान वाले बाळगून आहेत,या दोन ही त्तवांच्या श्रेष्ठ कोण या राजकीय द्वंद्वा मध्ये भारतीयत्वाच्या समस्या चा विळखा अजगर झाला आहे याकडे या इंडिया व हिन्दुस्थान वाल्यांच लक्षचं नाही.    

इंडिया ला युरोप, अमेरिकेशी नाळ जोडायची आहे. इंडिया क्रिकेट आणि बॉलिवूड ला धर्म मानतो. हिन्दुस्थान सर्व जगाचा बादशहा , विश्व गुरु बनु पाहतो, पण भारतातील सर्व समस्या जैसे थे ठेऊन हे दोघेही आपलं ध्येय साध्य करू शकणार नाहीत. 

भारत हा मेणबत्ती, दिवा बत्ती वाल्यांचा आहे . भारत दिल्लीतल्या आंदोलनाचा आहे . भारत एकमताने लोकशाही प्रवाही ठेवतो . कधी इंडिया वाल्यांना तर कधी हिन्दुस्थान वाल्यांना स्थिर सरकारे देतो . पण भारतीयत्वाच्या भावनेने भारावून काम करणाऱ्या,शेतकरी पुत्रांना,कामगार पुत्रांना, भारतीय सरकार देईल तो दिवस खरया अर्थाने भारताच्या प्रगतीचे दरवाजे उघडे करेल. भारतीयांना प्रत्येक घटकांतील प्रत्येक व्यक्ति च्या सर्वांगीण प्रगतीसाठी सशक्त आणि स्वच्छ असा आधुनिक भारत हवा आहे .भारत हा इंडिया व हिन्दुस्थान यांच्या आयडियॉलॉजीच्या पली कडे आहे.
हिन्दुस्थान आणि इंडिया यातली दरी मिटवायची व त्यांना भारतीयत्वाचा स्विकार करून जातपात-धर्मभेद नष्ट करून मानवतावादी भारत निर्माण करण्याची जवाबदारी भारतावर वर आहे . एक नवा देश उभा करायची जवाबदारी भारतावर वर आहे . देशासाठी मरायचे दिवस संपले आता सर्वसंसार परित्याग करून समाजसेवेत देशासाठीच जगायचे दिवस सोडुन पुरोगामी,प्रतीगामीच्या श्रृंखला तोडुन भारतीयांना रचनागामी व्हावं लागेल, असे . पण त्यासाठी आधी श्रम करावे लागतात हेही तो जाणतो . आर्थिक - वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीतून नवा भारत गेली वीस वर्षात धडपडत उभा राहतो आहे. भारताला कोण इंडिया कोण हिंदुस्थान म्हणतो    कोण डाव उजवा कोण कसा ? यात रस नाही. भारत तुमच्या दोहों च्या पडीक विचारधारा च्या पल्याड आहे. भारत म्हणजे लोकशाहीची लाट इंडिया म्हणजे व्हिजा ची रांग इंडिया म्हणजे अमेरिकेची आस. इंडिया म्हणजे बॉलिवूडचा थाट , इंडिया फेसबुक वर नांदतो , ट्विटर वर चिडतो , हिन्दुस्थान या सर्वांना troll करतो जातीय द्वेष पसरवितो,धार्मिक दंगली घडवण्यासाठी षड्यंत्र रचतो,या मध्ये मात्र आपला भारत धुमसतो,जळतो, तरीही यांना जिवंत ठेवण्याच काम भारत चं कर तो काहीही म्हणा विचाराच्या बाबतीत , परोपकार च्या बाबतीत कितीतरी पट भारत समृद्ध व स्वतंत्र आहे . 

 हिन्दुस्थान व इंडिया हे भारताचेच पिल्लू आहे . जातीवाद - धार्मिकता आणि पुरुषी भावनिकते सकट -या दोहोत आहेत, भारताचे गुण आणि अवगुण  आहेत . त्याचे प्रमाण कमी जास्त आहे - आणि मुख्य म्हणजे -  इंडियात स्वतःला बदलायची शक्ती आहे . इच्छाशक्ती आहे . स्वतंत्र विचारशक्ती आहे . पण त्यामध्ये ग्रामीण इंडिया च्या प्रगतीचा लवलेश ही दिसत नाही, इंडिया मानणारया कड़े शेतकरी, कामगार, शेतमजुर, बेरोजगारी, कुपोषण, यांच्या आर्थिक मागासल्या पणा विषयी या समस्या निराकरणाची कुठल्याही ठोस उपाय योजना नाहीत, धोरणे नाहीत, इंडियात खूप काही दोष आहेत. इंडिया काही सर्व गुणसंपन्न आदर्श नाही . हिच गत हिन्दुस्तान वाल्यांची सुद्धा आहे.हिन्दुस्तान वाद्याना गाई मध्ये देवता दिसतात पण कोणत्या गाई मध्ये, शेतकऱ्याच्या पाळीव गाई मध्ये,गोशाळेतील गाई मध्ये, की रस्त्यावर असणारयां भटक्या गाई मध्ये ,त्याला कोणी समजून घेत नाही. त्यावर कोणी प्रेम करत नाही.असाच हिन्दुस्थान ही आहे का? 

 आता इंडियाचा हिन्दुस्थान होणे नाही तो भारत भारतचं असणार आहे. भारत बदलणार आहे . इथल्या दोन देशातली विषमता भारत मिटवू शकेल अशी आशा करायला वाव आहे भारत आशावादी आहे भारत भूमि - तुझ्यातला  इंडिया व हिन्दुस्थान सर्व पूर्वग्रहांपासून स्वतंत्र होवो. सर्व पूर्वसंचितापासून स्वतंत्र होवो. भारत भूमि - तुझ्यातला तो बदलता भारत चिरायू होवो , समृद्ध भारत! स्वयंप्रकाशीत भारत।। भारत निर्माण आंदोलन।।।

Comments

Popular posts from this blog

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ