इंडियन स्वच्छता लीग 2.0’ अंतर्गत सफाईमित्रांनी जल्लोषात फोडली स्वच्छतेची इकोफ्रेंडली दहीहंडी
नवी मुंबई- ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण क्षमतेने सहभागी झाली असून व्यापक लोकसहभागावर भर देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिला जात आहे.
यामध्ये सफाईमित्रांचा दहीहंडी महोत्सव असा एक अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय वास्तूसमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो सफाईमित्रांनी व स्वच्छतामित्रांनी सहभागी होत दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी उपस्थित राहून सहभागी सफाईमित्र व स्वच्छतामित्रांना प्रोत्साहित केले.
दैनंदिन शहर स्वच्छता कामात मनापासून काम करणा-या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या कामाचा नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच सन्मान केलेला आहे. कोणत्याही राष्ट्रीय व राज्य सणाच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्याची परंपरा नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने जपली आहे.
Comments
Post a Comment