मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक


नवी मुंबई - मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून निर्दोष मतदार यादी ही निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याची पहिली आणि महत्वाची पायरी असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निवडणूक कामकाजाचे महत्त्व लक्षात घेऊन मतदार यादीत नवीन सेक्शन अॅड्रेस टाकणे व सेक्शन अॅड्रेस अद्ययावत करण्याचे काम काळजीपूर्वक करावे असे सूचित केले.

मा.भारत निवडणूक आयोग व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 घोषित करण्यात आला असून त्याबाबत माहिती देण्याकरिता व त्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांनी निवडणूक विषयक कामकाज करणारे नवी मुंबई महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, बेलापूर विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी श्री. संभाजी अडकुने, ऐरोली विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी श्रीम. अंजली पवार, नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक उपायुक्त श्री शरद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मतदान केंद्रस्तरिय अधिकारी (बीएलओ) यांची मतदार यादीच्या कामात महत्वाची भूमिका असून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणारा हा निवडणूक आयोगाचा दुवा असल्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सांगितले. त्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वयाची भूमिका ठेवत जास्तीत जास्त बीएलओ उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..