26,133 नवी मुंबईकरानी वंडर्स पार्कमध्ये घेतली स्वच्छतेची डिजीटल शपथ


नवी मुंबई - इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले असून यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर दिला आहे. रविवारी 17 सप्टेंबरला आठही विभागांमध्ये नऊ ठिकाणी सामुहिक स्वच्छता शपथ हा उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविण्यात आला ज्यामध्ये 1 लक्ष 14 हजार हून अधिक विदयार्थी, युवक व नागरिकांनी सहभागी होत नवी मुंबईच्या स्वच्छता विषयक जागरुकतेचे व एकात्मतेचे विशाल दर्शन घडविले.

अशाच प्रकारे आजच्या डिजीटल युगाला साजेसा अभिनव उपक्रम नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क येथे राबविण्यात आला. या ठिकाणी एका दिवसात 26 हजार 133 नागरिकांनी स्वच्छतेची डिजीटल शपथ घेत स्वच्छ शहराविषयी असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित केली.

   ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये ‘कचरामुक्त भारत’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून कचरामुक्त शहरांच्या उभारणीत प्रामुख्याने तरुणाईला सहभागी करुन घेत कचऱ्याविरोधात युवकांची लढाई (Youth V/S Garbage) या घोषवाक्यानुसार नव्या पिढीत स्वच्छतेचे महत्व रुजविले जात आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका युवक सहभागावर भर देत विविध उपक्रम राबवित आहे. 

अशाच प्रकारे वंडर्स पार्क येथे अभिनव स्वरूपात ‘स्वच्छतेची डिजीटल शपथ’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना या उपक्रमात सहभागी होणे सोयीचे व्हावे याकरिता वंडर्स पार्कमध्ये सकाळी 7.00 ते रात्री 10.00 या वेळेत ‘एक दिवसाकरिता विनामूल्य प्रवेश’ जाहीर करण्यात आला होता. यावेळी डिजीटल शपथ घेतल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या कारंज्यावरील लेझर शो दाखविण्यात आला. हजारो नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी भेट देऊन मुलाबाळांसह वंडर्स पार्कच्या सफरीचा आनंद घेतला.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..