नवी मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून विहित वयोमानानुसार सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री. सूर्यभान कलवार तसेच वरिष्ठ लिपिक- कर निरीक्षक श्री गणेश भालेराव या दोन कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ तसेच शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, भांडार विभागाच्या उपायुक्त श्रीम. मंगला माळवे आणि इतर अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने केलेल्या सेवाकार्याचा गौरव करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment