Posts

भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यतिथी... वाशी काँग्रेस भवन येथे पुण्यतिथी कार्यक्रम आयोजन..

Image
वाशी (नवी मुंबई) – भारताचे माजी पंतप्रधान आणि लोकशाहीचे खंदे नेतृत्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशी काँग्रेस भवन येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नवी मुंबई काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सदस्य मनोज उपाध्याय, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. बच्छेर व नवी मुंबई जिल्हा प्रभारी श्री. रमेश कीर साहेब, मुंबई जिल्हा समन्वयक अरविंदजी नाईक, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस लीनाताई लिमये, दत्ता माने, रवी जाधव, जिल्हा सचिव रमेश मेस्त्री, संतोष गव्हाणे, ओबीसी सेल अध्यक्ष संतोष सुतार, कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सुनील पारकर, वाशी काँग्रेस अध्यक्ष सचिन नाईक, बेलापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वाघ, उपाध्यक्ष दुर्योधन पारवे, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण बैले, तसेच नेरुळ असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष वीनोद गव्हाणे व ऐरोली विभाग ओबीसी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांची उपस्थिती लाभली. इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमात ...

समाजसेवक संतोष सुतार यांच्याकडून पोलिसांचा गुणगौरव...कोपरखैरणे पोलिसांची वेगवान कामगिरी...दीड तासात अपहरण प्रकरणाची यशस्वी सोडवणूक

Image
नवी मुंबई, 16 मे – कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम पथकाने अवघ्या दीड तासात अपहरण झालेल्या मुलाचा यशस्वी शोध घेऊन त्याचे सुरक्षित पुनरागमन घडवून आणले. या तातडीच्या आणि संवेदनशील कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. समाजसेवक तथा बहुजन नेते संतोष सुतार काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष नवी मुंबई आणि पदाधिकारी यांनी प्रसंगी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील पोलिस निरीक्षक सुनील बोडके गुंड पथक एपीआय नितीन कुंभार गुन्हे तपास एपीआय  राजेश महाला आणि पथक यांचा गुणगौरव करून सत्कार केला. अपहरणाची पार्श्वभूमी संपूर्ण प्रकरण एका आर्थिक देवाण-घेवाण वादातून निर्माण झाले होते. या वादामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी एका मुलाचे अपहरण केले होते. अपहरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन कुंभार, सुनील बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. जलद आणि प्रभावी तपास पोलीस पथकाने आधुनिक तंत्रज्ञान आणि माहीती नेटवर्कचा वापर करून अपहरणकर्त्यांचा तात्काळ शोध घेतला. या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप...

नेरूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धरमशी पटेल यांचे आवाहन.... ‘बॅन चायना’ मोहिमेची घोषणा... पाकिस्तानला युद्धमदत करणाऱ्या चीनचा केला जाहीर निषेध

Image
नेरूळ नवी मुंबई – भारत-पाकिस्तान युद्धात चीनने पाकिस्तानला हात दिल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी ‘बॅन चायना’ मोहीम सुरु केली आहे. नेरूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धरमशी रावरीया पटेल यांनी या मोहिमेचे नेतृत्व करत सर्व व्यापाऱ्यांना चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नवी मुंबईसह भारतातील सर्व व्यापाऱ्यांना चायना प्रॉडक्ट खरेदी न करण्याचेही आवाहन केले आहे. नेरूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धरमशी पटेल यांचा चायना मालावर बहिष्कार रावरीया पटेल यांनी सांगितले की, ‘चायना माल विक्रीमुळे अप्रत्यक्षरीत्या भारतातील मोठा पैसा चीनच्या तिजोरीत जातो. हा पैसा युद्धात पाकिस्तानला बळकट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे देशभक्ती आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून चायना मालावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे.’ स्थानिक उत्पादनांना प्राधान्य नेरूळ व्यापारी असोसिएशनने व्यापाऱ्यांना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारतीय उत्पादकांचे समर्थन करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. स्...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक बुरुजाच्या भूमिपूजन तसेच शिवेवरील देवी रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

Image
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* पंढरपूर शहराच्या लगत असणाऱ्या लक्ष्मी टाकळी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक हुड्डा बुरुजाचा भूमिपूजन सोहळा तसेच शिवेवरील देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.  या ऐतिहासिक हुड्डा बुरुजाचे भूमिपूजन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे तसेच युवानेते प्रणवदादा परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा मा.महेशनाना साठे, सरपंच संजय साठे, उपसरपंच सौ.रूपाली सागर कारंडे,माजी पंचायत समिती सदस्य रामदास ढोणे, यांच्यासह गावातील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक हुड्डा बुरुजासाठी लक्ष्मी टाकळी तिर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग-क मधून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने व मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा मा.महेशनाना साठे यांच्या प्रयत्नातून या वास्तूसाठी ३५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. तसेच शिवेवरील देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार ...

अहिल्यादेवी विद्यालय अलकुडचा निकाल 92.30 टक्के

Image
* मिरज :- संजय पवार दलितमित्र कै.गणपतराव ओलेकर शिक्षण विकास मंडळ अलकुड एस संचलित, अहिल्यादेवी विद्यालय अलकुड एस चा एस. एस. सी. बोर्ड 2025 चा निकाल 92.30 टक्के लागला आहे. विद्यालयाचे प्रथम द्वितीय व तृतीय आण्णासाहेब युवराज मोकाशी 91.60 % प्रथम, प्रियांका सुरेश मोटे 83.40% द्वितीय, रोहित रामदास पाटील 82.20 % तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुरेश बोराडे, वर्गशिक्षक सुधीरकुमार ओलेकर, स्मिता ओलेकर, पांडुरंग शिंदे, राणी बंडगर, मीनाक्षी ओलेकर, रोहिदास पाखरे, फिलीप गावित, सुशांत चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. वर्षभरातील विविध उपक्रमांसह सातत्याने मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिपकराव ओलेकर, सर्व संचालक, पालक व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले .

डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ

Image
(पत्रकार प्रतिक यादव रजिस्टर/मुंबई ९८२१६९३०७०/ प्रत्यक्षदर्शी अनुभवातून लिहिलेला लेख) नेरूळ - नवी मुंबईतील आरोग्य क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. संजय तारळेकर ते नवी मुंबईतील पहिले हृदय विकार तज्ञ (कार्डियोलॉजिस्ट) असून, गेली तीन दशके आपल्या सेवाभावी वृत्तीने हजारो रुग्णांचे जीवन सुखी व निरोगी केले आहे. नेरूळमधील 'शुश्रुषा' हॉस्पिटलची स्थापना डॉ. तारळेकर यांनी नेरूळमध्ये 'शुश्रुषा हॉस्पिटल' ची स्थापना करून नवी मुंबईतील आरोग्य सेवेला नवा आयाम दिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी तज्ञांच्या मदतीने हृदय विकारांवरील उपचार, शस्त्रक्रिया आणि तातडीच्या सेवा येथे उपलब्ध आहेत. रुग्णांची काळजी आणि त्यांच्या आरोग्याचे जतन हेच हॉस्पिटलचे ध्येय आहे. उच्च शिक्षण व आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ. संजय तारळेकर हे उच्च विद्या विभूषित डॉक्टर आहेत. त्यांनी देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांमधून हृदय विकार तंत्रज्ञान व उपचार पद्धतींचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पनवेल प्रांतातील न...

भाजपा नवी मुंबई चे नवे जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांची नियुक्ती.... धरमशी रावरीया पटेल यांनी केले अभिनंदन

Image
नवी मुंबई - महायुतीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षाने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीचे महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नवी मुंबईचे कार्याध्यक्ष धरम शी रावरीया पटेल यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. डॉ. राजेश पाटील हे नवी मुंबईतील एक प्रतिष्ठित समाजसेवक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर विशेष मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, अशी पक्षश्रेष्ठींना अपेक्षा आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी देण्याचे महत्वाचे काम डॉक्टर पाटील यांच्या खांद्यावर सोपवले गेले आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि नवी मुंबईत भाजपचा प्रभाव आणखी वाढेल, असा विश्वास धरम शी रावरीया पटेल यांनी व्यक्त केला आहे. डॉ. पाटील यांची ही नियुक्ती महायुतीच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत म...