धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक बुरुजाच्या भूमिपूजन तसेच शिवेवरील देवी रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न


*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*

पंढरपूर शहराच्या लगत असणाऱ्या लक्ष्मी टाकळी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक हुड्डा बुरुजाचा भूमिपूजन सोहळा तसेच शिवेवरील देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

या ऐतिहासिक हुड्डा बुरुजाचे भूमिपूजन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे तसेच युवानेते प्रणवदादा परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा मा.महेशनाना साठे, सरपंच संजय साठे, उपसरपंच सौ.रूपाली सागर कारंडे,माजी पंचायत समिती सदस्य रामदास ढोणे, यांच्यासह गावातील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

या ऐतिहासिक हुड्डा बुरुजासाठी लक्ष्मी टाकळी तिर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग-क मधून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने व मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा मा.महेशनाना साठे यांच्या प्रयत्नातून या वास्तूसाठी ३५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. तसेच शिवेवरील देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.


यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले की,पंढरपूर मध्ये वेळोवेळी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज लाखोभावी भक्त येत असतात त्यांची उत्तम सोय होण्यासाठी सरकारकडून विकासात्मक कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे शहरा लगत असलेल्या लक्ष्मी टाकळी गावात लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे या गावाला ऐतिहासिक ओळख देखील आहे ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे दक्षिण दिग्विजय साठी आले होते त्यावेळी त्यांचे पदस्पर्श या गावाला झालेले होते त्यामुळे ही आठवण जतन करण्यासाठी येथील हुड्डा बुरुज हे त्याचे प्रतीक मानले जाते. त्याचेच संवर्धन करण्यासाठी मा. महेशनाना साठे व सरपंच संजय साठे यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक बुरुजाचे पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन केले आहे त्याबद्दल त्यांची अभिनंदन करतो व कोणतीही मदत लागल्यास मला आवाज द्या मी तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येईल असा विश्वास देखील यावेळी लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांना आमदार समान अवताडे यांनी दिला.

यावेळी महेश साठे म्हणाले की,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक हुड्डा बुरुजाच्या कामाचे भूमिपूजन झाले हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि प्रेरणादायी सुद्धा आहे. या हुड्डा बुरुजाचे संवर्धन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण आपल्यासाठी सहकार्य केले तसेच या लक्ष्मी टाकळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करून देऊन या विकासासाठी मदत करेल अशीही त्यावेळी आश्वासन त्यांनी दिले होते आणि त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रेरित होऊन आम्ही सुद्धा, लक्ष्मी टाकळी गावा बरोबरच जिल्हा परिषद गटातील विकास कामे करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहणार असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी लक्ष्मी टाकळी गावातील सर्व आजि माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ

आरपीआय आठवले गट नवी मुंबई कार्याध्यक्ष धरमशी रावरिया आणि जिल्हाध्यक्ष महेश खरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार