अहिल्यादेवी विद्यालय अलकुडचा निकाल 92.30 टक्के
* मिरज :- संजय पवार दलितमित्र कै.गणपतराव ओलेकर शिक्षण विकास मंडळ अलकुड एस संचलित, अहिल्यादेवी विद्यालय अलकुड एस चा एस. एस. सी. बोर्ड 2025 चा निकाल 92.30 टक्के लागला आहे. विद्यालयाचे प्रथम द्वितीय व तृतीय
आण्णासाहेब युवराज मोकाशी 91.60 % प्रथम,
प्रियांका सुरेश मोटे 83.40% द्वितीय,
रोहित रामदास पाटील 82.20 % तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुरेश बोराडे, वर्गशिक्षक सुधीरकुमार ओलेकर, स्मिता ओलेकर, पांडुरंग शिंदे, राणी बंडगर, मीनाक्षी ओलेकर, रोहिदास पाखरे, फिलीप गावित, सुशांत चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. वर्षभरातील विविध उपक्रमांसह सातत्याने मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिपकराव ओलेकर, सर्व संचालक, पालक व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले .
Comments
Post a Comment