समाजसेवक संतोष सुतार यांच्याकडून पोलिसांचा गुणगौरव...कोपरखैरणे पोलिसांची वेगवान कामगिरी...दीड तासात अपहरण प्रकरणाची यशस्वी सोडवणूक
नवी मुंबई, 16 मे – कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम पथकाने अवघ्या दीड तासात अपहरण झालेल्या मुलाचा यशस्वी शोध घेऊन त्याचे सुरक्षित पुनरागमन घडवून आणले. या तातडीच्या आणि संवेदनशील कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. समाजसेवक तथा बहुजन नेते संतोष सुतार काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष नवी मुंबई आणि पदाधिकारी यांनी प्रसंगी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील पोलिस निरीक्षक सुनील बोडके गुंड पथक एपीआय नितीन कुंभार गुन्हे तपास एपीआय राजेश महाला आणि पथक यांचा गुणगौरव करून सत्कार केला.
अपहरणाची पार्श्वभूमी
संपूर्ण प्रकरण एका आर्थिक देवाण-घेवाण वादातून निर्माण झाले होते. या वादामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी एका मुलाचे अपहरण केले होते. अपहरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन कुंभार, सुनील बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.
जलद आणि प्रभावी तपास
पोलीस पथकाने आधुनिक तंत्रज्ञान आणि माहीती नेटवर्कचा वापर करून अपहरणकर्त्यांचा तात्काळ शोध घेतला. या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका होऊ शकली. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांचा सत्कार
या यशस्वी कामगिरीबद्दल काँग्रेस नवी मुंबई ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष सुतार, कोपरखैरणे ब्लॉक अध्यक्ष सुनील पारकर काकडे, विकास शिंदे, मायनॉरिटी विभागाचे पदाधिकारी हरूनिषा खान, सचिन बांगर, आणि किरण चिकणे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला. या सत्कार समारंभात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले आणि त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या सुरक्षेचे महत्व
संतोष सुतार यांनी या प्रसंगी बोलताना पोलिसांच्या त्वरित आणि प्रभावी कामगिरीबद्दल प्रशंसा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अशा धाडसी आणि संवेदनशील कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो. त्यांनी पोलीस दलाच्या यशस्वी कामगिरीसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
---
Comments
Post a Comment