भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यतिथी... वाशी काँग्रेस भवन येथे पुण्यतिथी कार्यक्रम आयोजन..
वाशी (नवी मुंबई) – भारताचे माजी पंतप्रधान आणि लोकशाहीचे खंदे नेतृत्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशी काँग्रेस भवन येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नवी मुंबई काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सदस्य मनोज उपाध्याय, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. बच्छेर व नवी मुंबई जिल्हा प्रभारी श्री. रमेश कीर साहेब, मुंबई जिल्हा समन्वयक अरविंदजी नाईक, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस लीनाताई लिमये, दत्ता माने, रवी जाधव, जिल्हा सचिव रमेश मेस्त्री, संतोष गव्हाणे, ओबीसी सेल अध्यक्ष संतोष सुतार, कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सुनील पारकर, वाशी काँग्रेस अध्यक्ष सचिन नाईक, बेलापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वाघ, उपाध्यक्ष दुर्योधन पारवे, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण बैले, तसेच नेरुळ असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष वीनोद गव्हाणे व ऐरोली विभाग ओबीसी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांची उपस्थिती लाभली. इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात सूत्रसंचालन दत्ता माने यांनी केले तसेच लीनाताई लिमये , संतोष सुतार, मनोज उपाध्याय व जिल्हा प्रभारी रमेश कीर साहेब आणि बाळकृष्ण बैले यांनी मार्गदर्शनपर भाषण करत राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी, तंत्रज्ञानातील योगदान व युवकांसाठी घेतलेल्या पुढाकारावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी अरविंद नाईक साहेब यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडले.
Comments
Post a Comment