भाजपा नवी मुंबई चे नवे जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांची नियुक्ती.... धरमशी रावरीया पटेल यांनी केले अभिनंदन
नवी मुंबई - महायुतीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षाने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीचे महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नवी मुंबईचे कार्याध्यक्ष धरम शी रावरीया पटेल यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
डॉ. राजेश पाटील हे नवी मुंबईतील एक प्रतिष्ठित समाजसेवक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर विशेष मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, अशी पक्षश्रेष्ठींना अपेक्षा आहे.
आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी देण्याचे महत्वाचे काम डॉक्टर पाटील यांच्या खांद्यावर सोपवले गेले आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि नवी मुंबईत भाजपचा प्रभाव आणखी वाढेल, असा विश्वास धरम शी रावरीया पटेल यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. पाटील यांची ही नियुक्ती महायुतीच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत पक्षाचे जाळे अधिक विस्तारेल आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---
Comments
Post a Comment