आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
वाशी नवी मुंबई | २१ जून २०२५ –(प्रतिक यादव) नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक यांनी एकत्र येत नागरिकांसमवेत योग साधना केली आणि उत्तम आरोग्यासाठी मिळून योगा करून योग जनजागृती संदेश दिला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महापालिका उपायुक्त डॉ. अजय गडदे , अभिलाषा म्हात्रे आणि स्मिता काळे यांनी केले होते. वनमंत्री गणेश नाईक आणि डॉ कैलास शिंदे प्रशासक यांचा संयुक्त योगा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी दोन योग साधक यांनी मिळून करण्यात येणाऱ्या योगा प्रकारात मिळून विविध योग आसने केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली आणि नवी मुंबईतील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते, ...