संतोष सुतार यांचे आयुक्तांना स्मरणपत्र... शिरवणे मधील फेरीवाल्यांसाठी बांधलेली इमारत सुरू करण्यास विनंती.




बेलापूर - नवी मुंबई पालिका क्षेत्र ऐरोली ते बेलापूर या परिसरात पालिकेच्या विविध विभागात मार्फत अनेक विकास कामे होत आहेत शहराचा विकास होत आहे शहराचा कायापालट होत आहे परंतु अजूनही नवी मुंबई शहरातील काही गावात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे आगरी कोळी वस्ती असलेल्या गाव सदृश्य भागात विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे.

 संतोष सुतार काँग्रेस पक्षातील ओबीसी सेल नवी मुंबई अध्यक्ष यांनी शिरवणे गावातील महत्त्वाच्या अतिप्रलंबित विषयाकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. सन 2010 साली बांधण्यात आलेली फेरीवाल्यांसाठी भाजीवाल्यांसाठी इमारत अजून सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे विषयाअंतर्गत नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना संतोष सुतार यांनी पत्र व्यवहार करून सदर इमारत सुरू करण्यासाठी विनंती केली होती परंतु विनंती करून देखील कोणतेच ठोस पाय योजना न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन आयुक्तांचे लक्ष वेधले आहे तरी येणाऱ्या काळात शिरवणे गावातील ही इमारत कधी सुरू होईल याकडे शिरवणे गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ही इमारत कोणत्याही परिस्थितीत पालिकेची पत्रव्यवहार करून लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ओबीसी नेते संतोष सुतार यांनी प्रण केला आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकसभा निवडणुक २०२४ एक परिमार्श! "संविधान वाचलं पाहिजे...संविधान वाचलंच पाहिजे.? - ॲड.पुजा प्रकाश एन.

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण