महाराष्ट्रातील पहिला वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित...नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा RPi A पदाधिकाऱ्यांकडून सत्कार...
नवी मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच वस्त्र पुनर्प्रक्रियेचा अभिनव प्रकल्प सुरू केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कडून सन्मान करण्यात आला. RPI (A) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या पक्षातील नवी मुंबई चे शिष्टमंडळ – नवी मुंबई संपर्कप्रमुख प्रतीक यादव, ऐरोली विधानसभा अध्यक्ष अमोल जावळे, विनोद इंगळे वरिष्ठ नेते यांनी आयुक्त डॉ कैलास शिंदे यांचा सत्कार करत त्यांच्या समाजोपयोगी कार्याची स्तुती केली.
डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात टाकाऊ कपड्यांवर प्रक्रिया करून दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तू – जसे की कापडी पिशव्या, मॅट, डिझायनर जॅकेट्स, लॅपटॉप बॅग्स इत्यादी – तयार केल्या जात आहेत.
हा उपक्रम देशपातळीवर दुसरा असून, महाराष्ट्रात प्रथमच राबवला जात आहे. नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर-४ येथील बहुउद्देशीय इमारतीत हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला केवळ स्थानिकच नव्हे तर केंद्र सरकारचाही पाठिंबा लाभला असून, केंद्रीय वस्त्र मंत्रालयातील सहसचिवांनीही नुकतीच या प्रकल्पाला भेट दिली.
सत्कार समारंभात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी असे सांगितले की, या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक दृष्टिकोन वाढीस लागेल तसेच समाजात कचर्याच्या पुनर्वापराबद्दल जागरूकता निर्माण होईल.
#highlight #NMMC
Comments
Post a Comment