मुंबई फॉर पीस....बुद्धांचा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी मुंबईत पदयात्रा आणि शांतता रॅली
मुंबई - (प्रतिक यादव )मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स अर्थात स्वप्नांचे शहर अशी ख्याती असलेल्या आशिया खंडातील महत्त्वाचे जागतिक इंटरनॅशनल सिटी म्हणजे मुंबई अशी ओळख निर्माण झालेल्या आपली मुंबई या शहरात दिनांक 2 जून रोजी विश्वगुरू भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांती प्रेम दया आणि करुणा हा मानवतेचा शांततेचा प्रेमाचा संदेश देत मुंबई फॉर पीस हा नारा देत मुंबई प्रांतातील समाजसेवकांकडून शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. विविध जाती धर्मातील वाढणारा जातीभेद आणि असंतोष नष्ट करण्यासाठी तसेच सामाजिक एकता वाढवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला समानतेचा हक्क अबाधित राखण्यासाठी मुंबई शहरात दादर येथे कोतवाल नगर ते दादर चैत्यभूमी या परिसरात या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या शांतता रॅलीत हजारो नागरिकांनी समाजसेवकांनी भाग घेतला तसेच मुंबई फोर पीस असा संदेश देणारे बॅनर प्रकाशित प्रदर्शित करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. मुंबई फॉर पीस या शांतता रॅलीतून भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिला गेलेला एकात्मतेचा समानतेचा शांतीचा आणि बंधू भावाचा संदेश जन माणसात रुजवण्यात आला.
प्रसंगी मुंबई फॉर पीस असा खूपच महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मुंबई प्रांतातील समाजसेवकांनी आंबेडकर वाल्यांनी ही मुंबई फॉर पीस असा संदेश देत आयोजित केलेली शांतता रॅलीच्या आयोजकांचे आभार मानले परंतु रॅली आयोजित करण्याअगोदर मुंबई नजीकच्या नवी मुंबई ठाणे रायगड कल्याण डोंबिवली वसई विरार या प्रांतातील समाजसेवकांना देखील संपर्क साधून या शांतता रॅलीत सहभागी करून घेण्याची गरज होती असे त्यांनी सांगितले मुंबई शहरातील नजीकच्या प्रांतातील समाजसेवकांच्या उपस्थितीने या शांतता रॅलीचे व्याप्ती अजून वाढली असती असे त्यांनी सांगितले तसेच भविष्यातील त्यांच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याची ग्वाही दिली.
Comments
Post a Comment