नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांना मुख्यालयांवर भव्यदिव्य रोषणाई करून दिली आगळीवेगळी भेट
बेलापूर नवी मुंबई - 2022 च्या सरत्या वर्षाला आणि 2023 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना एक आगळी वेगळी भव्य दिव्य आणि अविस्मरणीय भेट म्हणजेच नवी मुंबई पालिका मुख्यालयाला रोशनी करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेकडून प्रत्येक सण उत्सव यांच्या पूर्वसंध्येला अशी रोषणाई केली जाते परंतु आज नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी पालिकेने वेगळ्या प्रकारची थीम डिझाईन एलईडी लाइटिंग केली आहे त्यामुळे रात्री बारा वाजता अनेक नवी मुंबईकर पालिका मुख्यालयाजवळ येऊन फोटोज व्हिडिओ काढून त्याचप्रमाणे तरुण वर्गाकडून केक कट करून वर्षाचे स्वागत केले जाते. नव वर्षाच्या पूर्व संधेला नवी मुंबईतील सर्व नागरिकांच्या सोशल मीडियावरील स्टेटस वरती नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचे फोटो व्हिडिओ स्टेटस वरती टाकून एकमेकांना शेअर केले जात आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व नवी मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. (मुख्यालयावरील रोषणाईचा व्हिडिओ पाहण्यासाठी प्ल...