महाविकास आघाडीचा यशस्वी महामोर्चा
मुंबई प्रतिनिधी - आज दिनांक 17 डिसेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे महाविकास आघाडी च्या माध्यमातून यशस्वी महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. या महामोर्चा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना तसेच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक व स्थानिक पक्ष संघटना व संस्था यांनी या मोर्चामध्ये भाग घेतला व पाठिंबा दर्शवला. महाविकास आघाडीतील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरद पवार अजित दादा पवार शिवसेना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण आघाडीचे सर्व उच्च पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या महामोर्चा मध्ये उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्रातील महापुरुषांची तथाकथित केंद्रीय सत्ताधारी पक्ष पदाधिकारी यांच्याकडून चाललेली मानहानी सहन केली जाणार नाही व त्याच्याच निषेधार्थ महाविकास आघाडी च्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित केला होता. मुंबई तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या मोर्चाला हजेरी लावली. या मोर्चाच्या कालावधीत संपूर्ण मुंबई प्रांतातील मुख्य रस्ते व अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला होता. या मोर्चा मध्ये मुंबई नजीकच्या प्रांतातील नागरिकांनी ही पाठिंबा दिला याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडी मोर्चा मधील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते चालत जात असताना मुंबई प्रांतातील इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या खिडकीमधून पुष्पाचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मानसिक पाठबळ दिले. महाराष्ट्रातील पुरोगामी महापुरुषांचा अपमान कधी सहन केला जाणार नाही असा संदेश देऊन हा महाविकास आघाडीने यशस्वी मोर्चा आयोजित करून एक जबरदस्त शक्ती प्रदर्शन करून एकजुटीचा सामाजिक संदेश दिला. त्याचप्रमाणे मोर्चा झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेते आमदार खासदार मंत्री यांनी आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व आघाडीच्या प्रसिद्धी माध्यमांनी उपस्थित राहून महाविकास आघाडीच्या यशस्वी मोर्चाचे दखल घेतली.
Comments
Post a Comment