ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.
मुंबई - जगातील शाश्वत सत्य केवळ बुद्ध आहे जीवनामध्ये शांती दया करुणा याचा एकमेव मार्ग विश्वरूप तथागत गौतम बुद्ध आहे. याच्याशिवाय पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक हॉलीवुड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी बौद्ध धर स्वीकारला त्यातच बॉलीवूड मध्ये सर्व काही सोडून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु बनली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटातून या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इतकचं नाही तर 1994 च्या मिस इंडिया स्पर्धेतही या अभिनेत्रीने भाग घेतला होता. यावेळी तिनं ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांना टक्कर दिली होती. यानंतर या अभिनेत्रीने मिस टुरिझम इंडियाचा किताबही जिंकला होता. जाणून घेऊया अध्यात्मचा मार्ग स्विकारणारी अभिनेत्री कोण आहे. बरखा मदन (Barkha Madan) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. बरखा मदन ही अध्यात्मचा मार्ग स्विकारणारी पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वी ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमपासून सना खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी धर्म किंवा अध्यात्मचा मार्ग स्वीकारण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडली आहे. बरखा मदन देखील सर्व काही सोडून बौद्ध भिक्षु बनली आहे....
Comments
Post a Comment