रोटरी क्लबच्या कार्यक्रमास समाजसेवक कॅप्टन क्षितिज माटे कलाप्रेमी अर्पणा माटे यांची उपस्थिती
वाशी नवी मुंबई - दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी वाशी नवी मुंबई प्रांतातील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रोटरी क्लब यांच्या माध्यमातून समा हे सुहाना हा संगीतमय चॅरिटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिशय रंगतदार असा हा कार्यक्रम सायंकाळच्या प्रहरी आयोजित केला गेला. समा हे सुहाना या संगीतमय सायंकाळी अनेक प्रतिभावंत गायकांनी बॉलिवूड गोल्डन हिट्स गीत गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले त्याचप्रमाणे उत्तरार्धात अनेक प्रेक्षकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला व या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. रोटरी क्लब नवी मुंबई यांनी सदर प्रांतातील अविकसित गाव दत्तक घेऊन विकसित करण्याकरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी तिकिटांच्या माध्यमातून तसेच रहेजा ग्रुप एलआयसी हाऊसिंग एमजी ऑटोमोबाईल्स कार्यक्रमास प्रायोजक होते. या कार्यक्रमास नवी मुंबई परिसरातील समाजसेवी उद्योजक कॅप्टन क्षितिज माटे व कलाक्षेत्रात सतत नव नवीन उपक्रम राबवणारी उद्योजिका अर्पणा माटे त्याचप्रमाणे रिद्धिमा फाउंडेशनचे संस्थापक संतोष गायकवाड व त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक सर यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली आणि रोटरी क्लब नवी मुंबईचे आयोजक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले व भविष्यातील त्यांच्या उपक्रमास सहभागी होण्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment