लोकप्रिय समाजसेवक सातारा रत्न डॉ. सुशीम सकपाळ अभिष्टचिंतन सोहळा

खांदा कॉलनी पनवेल प्रतिनिधी - दिनांक 18 डिसेंबर रोजी पनवेल रायगड प्रांतातील लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर सुशीम सपकाळ जन्मदिनाच्या निमित्ताने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा जीवन ज्योती ज्येष्ठ नागरिक संघ संविधान संघर्ष समिती जेएनपीटी कामगार मित्रपरिवार त्याचप्रमाणे खांदा कॉलनी पनवेल प्रांतातील अनेक समाजसेवक कार्यकर्ते पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांनी आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी रायगड पनवेल नवी मुंबई मुंबई तसेच नजीकच्या प्रांतातील अनेक तरुण तरुण-तरुणी अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच शासनातील आजी-माजी पदाधिकारी कर्मचारी यांनी हजेरी लावली. या प्रसंगी डॉक्टर सुशीम सपकाळ यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यासाठी नेरुळ प्रांतातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक यादव पनवेल प्रांतातील लोकप्रिय संस्था झेन फाउंडेशन चे अध्यक्ष दादासाहेब जाधव त्याचप्रमाणे कामोठे प्रांतातील विशेष करून तरुणांसाठी कार्य करणारी संघटना अक्षय कांबळे युवा मंचाचे अध्यक्ष समाजसेवक अक्षय कांबळे यांनी देखील हजेरी लावली. या ठिकाणी डॉक्टर सुशीम सकपाळ यांनी त्यांनी त्यांच्या तरुणाईपासून आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. डॉक्टर सुशील सपकाळ हे कला प्रेमी व उच्च विद्या विभूषित आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टर ही पदवी घेऊन त्याचप्रमाणे नॅचरल थरेपी रेकी योगा यासारख्या अनेक शाखेमध्ये त्यांनी अभ्यास करून या पदवीदेखील प्राप्त केल्या. 
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या समाजसेवकांना कधीच विश्रांती नसते या उक्तीप्रमाणे तरुणाई पासूनच डॉक्टर सुशीम यांनी जेएनपीटी येथे शासकीय सेवेत असताना शेकडो तरुणांना मदत करून त्यांना नोकरी मिळवून देण्यास मदत केली. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात देखील अनेकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करत असताना देखील त्यांनी त्यांच्या कुटुंबाला योग्य दिशा देऊन कुटुंबास देखील न्याय दिला.एक उत्तम वक्ता समाजसेवक उत्कृष्ट पिता योगाचार्य कलाप्रेमी व सर्वांवर प्रेम करणारा व मनमोकळे व्यक्तिमत्व डॉक्टर सुशील सपकाळ हे एक सातारा रत्न आहेत यात अजिबात शंका नाही. याच ठिकाणी अनेक तरुणांनी तसेच खांदा कॉलनी प्रांतातील नागरिकांनी डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्यासारखा प्रामाणिक समाजसेवक भावी नगरसेवक आमदार खासदार असावा अशी प्रांजल भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी भविष्यात त्यांनाच सहकार्य करण्याचे वचन दिले व प्रतिज्ञा घेतली अशा प्रकारे नागरिकांनी पुढाकार घेऊन डॉक्टर सुशीम सकपाळ यांना येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने मानसिक पाठबळ दिले. त्याचप्रमाणे दूर प्रांतातून आलेल्या समाजसेवक व कार्यकर्त्यांसाठी डॉक्टर सुशीम सकपाळ यांनी स्नेहभोजन देखील ठेवले होते अशा प्रकारे अत्यंत आनंदमय व उत्साह पूर्ण वातावरणात लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर सुशील सकपाळ यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पाडण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..