Posts

श्रीरामपूर मध्ये बौद्ध तरुणांवर झालेल्या अत्याचार विरोधात आर पी आय ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा एल्गार.. श्रीरामपूर मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश.

Image
श्रीरामपूर -  साखर कामगार हॉस्पिटलमध्ये मारहाण झालेल्या चार मुलांना भेटीसाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु दीपक भाऊ निकाळजे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते आले होते यावेळी शासकीय विश्रागृहावर याठिकाणी पत्रकारांशी बोलताना दीपक भाऊ निकाळजे म्हणाले की, पीडित मुलांपैकी काही मुले मातंग समाजातील व काही मुले बौद्ध समाजातील आहेत मात्र एकाच मुलाच्या नावानं बाहेर दाखल केलेले असून हे सरळ चुकीचे आहे त्यामुळे प्रत्येक मुलाच्या फिर्यादीनुसार नवीन तक्रार दाखल करणे गरजेचे आहे सदर अन्याय झालेल्या मुलांच्या नावाने  1) कुणाल देविदास मगर  2) शुभम विजय मागाडे 3)ओम अशोक गायकवाड 4) प्रणय अरविंद खंडागळे या 4 मुलांच्या फिर्यादीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची माध्यमातून हक्क आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत आणि कायदा आमच्या बापाचा आहे कायदा आमच्या बापाने लिहून ठेवला आहे आम्ही शांत आहे मात्र आमच्या शांततेचा कोणी अंत पाहू नये....

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईतून सोशल मीडिया सेल या विभागात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी श्री. तेजस उत्तम फणसे यांची नियुक्ती.

Image
पुणे - पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया फ्रंट विभागातर्फे सोशल मीडियाचे एक दिवसीय शिबिर दिनांक २० ऑगस्ट, २०२३ रोजी घेण्यात आले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरद पवार साहेब, खा. श्रीनिवास पाटील साहेब, प्रांताध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते जितेंद्रजी आव्हाड, युवा नेते रोहित दादा पवार या सर्व मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये माझी सोशल मीडिया सेल विभाग - महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. जयंतजी पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया विभाग राज्यप्रमुख श्री. महादेव बालगुडे साहेब व कार्याध्यक्ष मा. मोहसिन शेख यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी नक्कीच येणाऱ्या काळात अतिशय विश्वासाने आणि प्रामाणिक पणे पार पाडेन. या शिबिरासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस...

फॅशन डिझायनिंग स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये सुदत्त खरात यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

Image
सानपाडा नवी मुंबई - आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी फॅशन डिझायनिंग आणि ट्रेनिंग क्षेत्रातील नावाजलेली कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था ॲपेरल ट्रेनिंग सेंटर च्या सानपाडा विभागातील ट्रेनिंग सेंटर येथे समाजसेवक सुदत्त खरात आणी प्रतिक यादव यांनी फॅशन डिझाईनिंग चा कोर्स करणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन करून फॅशन क्षेत्रातील स्कोप व करिअर या विषयावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे उद्योजक मरचेंडायजर सुदत्त खरात यांची  प्रिय बहिण Vaishali Sandeep Salvi यांनी 2006 साली याच संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन मेहनत करून मर्चंटडायसिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून स्वतःचे स्थान बनवले त्याचप्रमाणे माणिकचंद उद्योग समूहाचा पुणे येथील संपूर्ण बंगल्याचे मरचेनडायजिंग देखील आमच्या वैशाली ताईनेच केले होते तसेच वैशालीताईचे ऍडमिशन हे स्वतः सुदत्त खरात यांनी केले होते या त्यांच्या जुन्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला.  प्रसंगी उपस्थित सर्व तरुण-तरुणी विद्यार्थी यांनी प्रेरित होऊन स्वतःचे नाव देखील वैशालीताई प्रमाणेच उज्वल करण्याचे आश्वासन दिले प्रसंगी या संस्थेचे मुख्याध्यापक यांचे समाजसेवक स...

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी सूचनापेटी

Image
  पाम बीच - नवी मुंबई शहराची स्वच्छता ही ओळख बनलेली असून हा स्वच्छतेचा ब्रँड आणखी दृढ करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाच्या बळावर नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. कोणताही नावलौकिक प्राप्त करण्यापेक्षा तो नियमितपणे टिकवणे ही अधिक कठीण गोष्ट असते. त्यादृष्टीने स्वच्छता कार्यातील सुधारणेच्या विचार प्रक्रियेत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कोणत्याही विधायक उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे ही भूमिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर नजरेसमोर ठेवली आहे.       या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यदिनी 'स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री' या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्हव्दारे थेट संवाद साधताना आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये वैचारिक लोकसहभाग घेणारा नाविन्यपूर्ण उपक्रम मांडला.      महापालिका अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानाच्या आसपासच्या इमारती व भागातील स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेऊन त्यामधील त्रूटी दूर करण्यासाठी जागरूकतेने काम करावे व 'स्वच्छतेसाठी योगदान देणारा कर्मचारी' बनावे...

बौद्ध धम्म परिषद उलवे कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न ..आंतरराष्ट्रीय भंते भदंत बा डाविटो यांची उपस्थिती

Image
  उलवे रायगड - १९ऑगस्ट २०२३रोजी  बौद्ध धम्म परिषद कार्यालयाचे उलवे येथे उद्घाटन झाले. आयु. आदरणीय रामराव देवरे सर(सेवानिवृत्त मुख्याध्यापक)यांच्या हस्ते हा सोहळा झाला. आणि या सोहळ्यास आशिर्वाद देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भंते वंदनीय भदंत बा डाविटौ तसेच वंदनीय भदंत बोधानंद थेरो,वंदनीय भदंत पुर्ण हे लाभले. तीनही भन्तेंचे आगमन होताच आपल्या बौद्ध भगिनींनी त्यांच्या मार्गावर पुष्प पाकळ्यांची पखरण आणि वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. आणि कार्यालया पर्यंत घेऊन आले. फित कापून उद् घाटन झाल्या नंतर त्यांना आदराने कार्यालयात आसनस्थ केले.  त्यानंतर आयु. नरेश कांबळे (उपाध्यक्ष)यांनी सुत्रसंचालन करून सगळे विधी यथायोग्य पार पाडले. त्यानंतर भदंत बोधानंद थेरो यांनी धम्म देसना दिली. नंतर आयु. बाबुराव इंगळे (मार्गदर्शक)आयु. नरेश राऊत साहेब(कोषाध्यक्ष)मी स्वतः वामन वाघमारे(अध्यक्ष)आयु. विजय हबळे  (उप कोषाध्यक्ष)आयु. विनिता बर्फे मॅडम(को.क.सदस्य)आयु. वनिता कांबळे (सचिव)यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी सरणत्तेय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. तद्नंतर आयु. शुभांगी लाळे (उप को...

19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाची माहिती जाणून घ्या. पुढील प्रमाणे

Image
जागतिक छायाचित्रण दिन - दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल ने टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सांगते, असे म्हणतात. छायाचित्र म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू व घटनेची टिपलेली प्रतिमा. छायाचित्रणाचा शोध कोणत्याही एका शास्त्रज्ञाने लावलेला आहे, असे म्हणता येणार नाही. या कलेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांचे यात योगदान आहे. चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दाे दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत. या कॅमेऱ्यात सुधारणा क...

काय आहे मणिपूरच सत्य वाचा लेखात पुढील प्रमाणे - पूजा प्रकाश एन

Image
 मुंबई महाराष्ट्र-  निसर्ग रम्य पहाड़ी भागाने व्यापलेलं मणिपुर नैसर्गिक विविध संसाधनानी नटलेलं मणिपुर, सर्व जन गुण्यागोविंदाने राहत असतांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये मैतेइ समूहास आरक्षण दिल्या नंतर आरक्षण का व कोणाला? या प्रश्नांना घेऊन, मुलनिवासी कोण? मुलनिवासी यांना सुविधा दिल्या अशा अपप्रचाराची राळ उठवून नागा, मैतेइ,आणि कूकी या समूहामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या यंत्रणानी जो चुकीचा प्रचार करून मणिपुर पेटवलं , या देशविघातक कृत्य करणारयानी आपल्या देशाची अंतरराष्ट्रीय स्तरावर पत कमी होऊन नामुष्की चे शिक्के आपणास लागतील याचा जरा ही विचार केला नाही, राज्याच्या अंतर्गत सुरक्षास न जुमानता, कायद्याची पर्वा न करता माणुसकी तत्ववाद यास पायदळी तुडवून या देशातील येणाऱ्या पीढी साठी "एक काळा कुकर्म इतिहास" निर्माण केला अशा यास कारणभूत ठरणाऱ्या त्या सर्व घटकांचा भारतीय म्हणुन प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी निषेधच करायला हवा,मणिपूरमधील मूळ भारतीयांना हक्क देण्यास सुरुवात केली आहे, या गोष्टीचा विरोधकांना राग आला आहे. मणिपूर गेली कित्येक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होता....