Posts

कर्जत मधे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या बॉलीवूड नगरी शोकाकुल

Image
कर्जत - कला दिग्दर्शक आणि निर्माते, नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी आत्महत्या केली. वृत्तानुसार, नितीन महाराष्ट्रातील कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत असून पुढील तपास सुरू आहे. “आज सकाळी श्री नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, असे रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अहवालात असे म्हटले आहे की देसाई यांचा स्टुडिओ चांगला चालत नसल्याने आर्थिक ताणतणाव होता. मुंबईपासून 50 किमी अंतरावर रायगडच्या कर्जत परिसरात हा स्टुडिओ आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची बाब उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नितीन देसाई हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच मालिका व नाटकांसाठी भव्य असे सेट उभारण्यासाठी प्रसिद्ध होते. मात्र, कर्जतमधील त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे...

लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

Image
नवी मुंबई -  थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.       याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका श्रीम. काशीबाई लांडगे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात, श्री. संजीव पवार, श्री. अरविंद उरसळ, उपअभियंता श्री. जयंत कांबळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नवी मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त अमरिश पटणीगिरे व इतर अनेक अधिकारी कर्मचारी निवृत्त

Image
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेचा दीर्घ अनुभव असणारे अधिकारी, कर्मचारी महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत असताना ही एक प्रकारे महानगरपालिकेची हानी असल्याचे मत व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  जुलै महिन्यात महानगरपालिका सेवेतून निवृत्त होणारे अधिकारी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, मुख्य शल्य चिकित्सक डॉ. हर्षद लोहार, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आठवले, प्र. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनवणे, प्रशासकीय अधिकारी श्री. मोहन जाधव, सिस्टर इन्चार्ज श्रीम. चित्रा महाजन, स्टाफ नर्स श्रीम. सविता कणसे, आरोग्य सहाय्यक श्रीम. मेघा चव्हाण, वाहन चालक श्री. रमेश जमखंडी, आया श्रीम. पुष्पा साळवे व श्रीम. पुष्पलता भोई या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणारे उप अभियंता (यांत्रिकी) श्री. जयवंत आहेर यांना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त ...

रोजगार निर्माणाकरिता शासकीय स्तरावर सार्वजनिक प्रतिष्ठान निर्मिती आवश्यक - पूजा प्रकाश एन

Image
मुंबई महाराष्ट्र - भारतात दर वर्षी १ कोटी ६० लाख तरुण नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात, परंतु त्यांच्यासाठी फक्त १५ ते २० लाख नोक-यांची निर्मिती होत असते असे गंभीर चित्र आज या देशात आहे. मध्यंतरी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने एक पाहणी केली होती. या संस्थेचे निष्कर्ष बेरोजगारीचे भयानक चित्र स्पष्ट करतात. एका अर्थशास्त्रीय सव्‍‌र्हेप्रमाणे भारतात जवळजवळ ७७ टक्के कुटुंबात कायमस्वरूपी नोकरी करणारी व्यक्ती असत नाही. म्हणजेच रोजंदारी किंवा हंगामी नोकरी असते. तर ६७ टक्के कुटुंबे अशी आहेत की त्यांना महिन्याला १० हजारांपेक्षा कमी उत्पन्न असते. निती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या त्रैवार्षीक कृती आराखडय़ात रोजगारी निर्मितीचे प्रमाण प्रचंड घटल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील राज्यांमधील तरुणांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार भीषण झाला आहे. या राज्यांमध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे. उद्योगधंदा काढण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसते. लहान-सहान नोकरी सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीत ही मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे सहज वळू शकतात, असा निष्कर्ष एका समाजशास्त्रीय सव्‍‌र्हेतून निघाल...

सामाजिक भान जपणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दीपक भाऊ निकाळजे यांनी जन्मदिवस सोहळा रद्द करून कुटुंबासमवेत जन्मदिवस केला संपन्न

Image
मुंबई - (बातमीदार) काल दिनांक २७ जुलै रोजी आरपीआय A राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवस असतो परंतु राज्यात तसेच देशातील सध्याची राजकीय अस्थिरता, महापूर,महागाई,बेरोजगारी,महिलांवर होणारे अत्याचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आणि आपण सगळेच समाजाचे देणे लागतो या अशा गंभीर परीस्थीती मध्ये आपला वाढदिवस कार्यकर्त्याना मोठया प्रमाणात साजरा न करण्याचे आव्हान केले व आपल्या निवासस्थानी  कुटुंबीयांनी अतिशय साध्या पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा केला. देशभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या कार्यकर्त्यांनी लाखो  शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला प्रंसगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मालमत्ताकर न भरणा-या उद्योजकांच्या मालमत्ता सील तसेच उर्वरित थकबाकीदार लघुउद्योजकांवरही उगारणार अटकावणीचा बडगा - नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर

Image
नवी मुंबई - पालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या याचिकेवर आदेश पारीत करताना मा. सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणीची पुढील तारीख देत त्यापूर्वी सर्व थकबाकीदार लघु उदयोजकांनी मालमत्ता कर भरवा असे आदेश दिले होते. जर मालमत्ता कर भरला नाही तर त्यादिवशी मा. सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार नाही असेही स्पष्ट केले होते. त्याचवेळी लघु उद्‌योजकांनी मालमत्ता कर भरणा केला नाही तर मालमत्ता कर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याचे आदेशही नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आले होते. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 424 मालमत्ता कर थकबाकीदार लघुउद्योजकांना सौजन्य पत्र वितरित केली होती. या 424 थकबाकीदारांकडून 148 कोटी रक्कम भरणा केली जाणे अपेक्षित होते. तथापी 424 थकबाकीदारांपैकी केवळ 122 थकबाकीदारांनी मूळ मालमत्ता कर रक्कमेचा भरणा केला असून ही रक्कम साधारणत: 36 कोटी इतकी आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने आदेशित करुनही थकबाकीदार मालमत्ताकर धारकांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याचे लक्षात आल्याने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार मालमत...

नवी मुंबई पालिका आयुक्त श्री नार्वेकर यांचे अतिवृष्टी आणि आपत्कालीन काळात सतर्कतेचे आदेश

Image
        नवी मुंबई - 17 जुलैपासून मोठया प्रमाणात सुरु झालेल्या पावसाने जराही उसंत घेतली नसून 28 जुलैपर्यंत मागील 12 दिवसात नमुंमपा क्षेत्रात तब्बल 814.99 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष असून संपूर्ण आपत्ती निवारण यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे.       महानगरपालिकेच्या अधिका-यांचा व्हॉटसॲप समुह तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक समूह यावर नियमित संपर्कात राहून आयुक्त स्वत: आढावा घेत आहेत. एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे निराकरण होऊन काम झाल्यानंतरची छायाचित्रे प्राप्त होईपर्यंत आढावा घेतला जात असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क राहून क्षेत्रीय स्थानांवर दक्षतेने काम करीत आहे.       नवी मुंबई हे शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने मोठया भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचते. अशी 14 ठिकाणे महानगरपालिकेमार्फत निश्चित ...