नवी मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त अमरिश पटणीगिरे व इतर अनेक अधिकारी कर्मचारी निवृत्त
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेचा दीर्घ अनुभव असणारे अधिकारी, कर्मचारी महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत असताना ही एक प्रकारे महानगरपालिकेची हानी असल्याचे मत व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जुलै महिन्यात महानगरपालिका सेवेतून निवृत्त होणारे अधिकारी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, मुख्य शल्य चिकित्सक डॉ. हर्षद लोहार, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आठवले, प्र. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनवणे, प्रशासकीय अधिकारी श्री. मोहन जाधव, सिस्टर इन्चार्ज श्रीम. चित्रा महाजन, स्टाफ नर्स श्रीम. सविता कणसे, आरोग्य सहाय्यक श्रीम. मेघा चव्हाण, वाहन चालक श्री. रमेश जमखंडी, आया श्रीम. पुष्पा साळवे व श्रीम. पुष्पलता भोई या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणारे उप अभियंता (यांत्रिकी) श्री. जयवंत आहेर यांना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, सेवानिवृत्त होणारे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयचे सह आयुक्त तथा माजी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई व प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय पत्तीवार, श्री. जगन्नाथ सिन्नरकर, श्री. मोहन डगावकर, श्री. सुरेंद्र पाटील, श्री प्रकाश कुलकर्णी, श्री. दादासाहेब चाबुकस्वार, श्री. देशपांडे, श्री. अशोक मढवी आवर्जून उपस्थित होते.
Comments
Post a Comment