लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
नवी मुंबई - थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका श्रीम. काशीबाई लांडगे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात, श्री. संजीव पवार, श्री. अरविंद उरसळ, उपअभियंता श्री. जयंत कांबळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment