आरक्षणाचे आणि विकासाचे सरकार पुढे मोठे आव्हान...- इ झेड खोब्रागडे
नागपूर - सध्या स्थितीत सरकार च्या समोर एकमेव आव्हान आहे ते मराठा समाजाला आरक्षण देण्याचे. सरकार सत्ताधारी म्हणतात, इतर राजकीय पक्ष म्हणतात ,आरक्षण द्या, द्यायला पाहिजे. देऊन टाकावे, इतराचे आरक्षणाला धोका न करता. खरं तर आरक्षणाचा प्रश्न सरकारनेच गुंतागुंतीचा करून ठेवला. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच अनु जाती /जमातीचे आरक्षण , पदोन्नती मधील आरक्षण हे सर्व विषय रेंगाळत पडले आहेत. न्यायालयात गेले आहेत. एक काळ होता, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने ओबीसी ना आरक्षण दिले तेव्हा आरक्षण विरोधी समाजाने आंदोलन, जाळपोळ हिंसाचार घडवून आणला. काळ बदलला ,आता तेच आरक्षणविरोधी लोक आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करतात. संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि संविधानाचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आरक्षण मागणाऱ्यानी आता तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खुल्या मनाने स्वीकारले पाहिजे. आरक्षण हा विषय मूलभूत हक्काचा असून ,समानता प्रस्थापित करणारा आहे.सत्तेत असणाऱ्यांनी - सरकारने जनकल्याणासाठ...