गुणवत्तापूर्ण अधिकारी घडवणारी संस्था म्हणजेच गरुडझेप अकॅडमी : प्रा.सुमित उरकुडकर


कोल्हापूर  - गुणवत्तापूर्ण अधिकारी घडवणारी संस्था म्हणजेच गरुडझेप अकॅडमी होय.असे प्रतिपादन प्रा.सुमित उरकुडकर यांनी केले. ते गरुडझेप अकॅडमी कोल्हापूर विभाग येथे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी गरुडझेप अकॅडमीचे संस्थापक डॉ.सुरेश सोनवणे हे होते. प्रास्ताविक कोल्हापूर विभागाचे हेड प्रा.विजय राठोड यांनी केले.     
                सुमित उरकुडकर पुढे म्हणाले की,सध्याच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत परंतु त्यासाठी गुणवत्ता फार महत्त्वाची आहे. गुणवत्ता मिळत नसते ती निर्माण करावी लागते. त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य, जिद्द, चिकाटी आवश्यक आहे. काही कालावधीसाठी विद्यार्थ्यांना नियमांच्या बंधनात राहावे लागेल पण तुमचा भविष्यकाळ उज्वल असेल.आपले अस्तित्व सिद्ध करून आपल्या आई- वडिलांचे उपकार फेडता आले पाहिजे. म्हणजेच तुमचे, तुमच्या आई वडिलांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. आत्महत्या करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवून स्वतःला सिद्ध करण्याची आज गरज आहे.आज पर्यंत अनेक एन.डी.ए, पोलीस,आर्मी अधिकारी गरुडझेप अकॅडमीने निर्माण केले आहेत.
                      यावेळी गरुडझेप अकॅडमीचे संस्थापक डॉ. सुरेश सोनवणे, कोल्हापूर विभागाचे हेड प्रा.विजय राठोड ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सूत्रसंचालन प्रा.सुरेश डोणे यांनी केले. तर आभार बादल पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

लोकसभा निवडणुक २०२४ एक परिमार्श! "संविधान वाचलं पाहिजे...संविधान वाचलंच पाहिजे.? - ॲड.पुजा प्रकाश एन.

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण