नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशाने वायु आणि धूळ प्रदूषण करणाऱ्या बिल्डरांवर पालिकेची कारवाई ..दीड कोटीची दंड वसुली तसेच अनेकांना स्टॉप वर्क नोटीस काढण्याचा इशारा

 

नवी मुंबई - नवी  मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमध्ये बेसमेंटच्या खोदकामामुळे  मोठया प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होते. याबाबत अलिकडेच मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल करुन घेतलेल्या Suo-moto (PIL No. 3/2023) मध्ये दि.11 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केलेले आहे. 

      त्यानुसार मा. उच्च न्यायालयाकडील दि. 11 डिसेंबर 2023 रोजीचे आदेश तसेच वायू व ध्वनी प्रदूषण आणि ब्लास्टींगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होत असलेल्या तक्रारी विचारात घेता त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यतेन  “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure”) (SOP) तयार करुन दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मानक कार्यप्रणालीची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अंर्तभूत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

      त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम चालू असलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी केली असता या ठिकाणी मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

      या अनुषंगाने अशा मानक कार्यप्रणालीनुसार उपाययोजना केल्या नसलेल्या एकूण 87 प्रकल्पांच्या विकासकांना संबंधित सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचेमार्फत दंडात्मक शुल्क भरणेकरिता नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून एकूण रु.1 कोटी 40 लक्ष 4 हजार 39 इतकी दंडात्मक शुल्क रक्कम वसूल करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे काही विकासकांनी मानक कार्यप्रणालीची पूर्तता केल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या विकासकांनी सदर मानक कार्यप्रणालीचे उल्लघंन केले आहे अशा विकासकांना काम बंद करणेबाबतची नोटीस (Stop Work Notice) देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नोटीशींची दखल न घेणाऱ्या विकासकांवर महानगरपालिकेमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..