पुजा प्रकाश एन.यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध पुरस्कार स्टीम्युलेटींग फिलींग ऑफ पॅट्रोटिजम राष्ट्रीय अवार्ड प्रदान



जयहिंद सैनिक संस्था, मुंबई जम्मू-कश्मीर डोगरा समाज, युवा सेवा संघ,व सावरकर विचार मंच, यांच्या द्वारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पुजा प्रकाश एन. या प्रयाश सहेली मंच व भारत निर्माण आंदोलन माध्यमातुन भारत राष्ट्रात महिला, युवक-युवती यांनी "समृद्ध युवा समृद्ध राष्ट्र"स्वावलंबी महिला स्वावलंबी राष्ट्र " या उद्दीष्टपूर्ती करीता कार्यरत आहेत 
त्यातही शेतकरी आत्महत्या प्रमाण असणाऱ्या विदर्भ प्रांतात शेतकरी कुंटुबातील युवकांनी उद्योग, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून कौटुंबिक प्रगती करावी यासाठी प्रयत्नशील असणारया,तसेच अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरात आदिवासी युवकांनी आर्थिक सक्षम व्हावे हा दृष्टीकोण समोर ठेऊन आदिवासी युवकांनी उद्योग क्षेत्रात निपूण व्हावे करीता प्रशिक्षण देऊन प्रेरीत करुन उद्योग करण्यासाठी अर्थ सहाय करणारया,यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या आदिवासी बहुल क्षेत्रात झरी जामणी व घांटजी तहसील क्षेत्रांतर्गत येणारया गांवामध्ये कुमारी मातांचा प्रश्न मोठया प्रमाणात आहे, कुमारी मांताचे प्रमाण भविष्यात वृद्धि होऊ नये याकरीता कार्य कार्य सुरु आहे तसेच मराठवाड़ा विभागामध्ये औरंगाबाद, नांदेड़ व हिंगोली जिल्हयात शाळा बाह्य मुलांना शिक्षणांचं महत्व पटवून देऊन शिक्षण घेण्यास बाध्य करणे यावर कार्य करतात तसेच भटके विमुक्त,घुमान,गोसावी व पारधी लोक समूहा करीता त्याच्या मध्ये आधुनिक ज्ञानाचा प्रसार व्हावा करीता अमरावती जिल्हयातील बहिलोलपुर पारधी बेड़ा,भानखेडा पारधी बेड़ा, हिंगोली जिल्हयातील हिंगोली शहरानजीक असणारया गोसाई समूहा करीता कार्यरत आहेत,
तसेच ग्रामीण भागातील महिलांनी ,युवकांनी सामाजिक उत्थान दर्शक साहित्य निर्माण करावे करीता "कार्यरत आहेत त्याचप्रमाणे
 भारत निर्माण आंदोलन  द्वारा एक राष्ट्र एक समान शिक्षण पद्धती,एक परिवार एक शासकीय नौकरी, आरोग्याचा अधिकार,
अकार्यक्षम लोकप्रतीनीधींचं लोक प्रतिनिधितत्व रद्द अशा विषयांवर कार्यरत आहेत, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नवी मुंबई वाशी येथील उत्तराखंड भवन येथे नेताजी सुभाष चन्द्र बोस स्थापित आझाद हिंद सरकार एक्याऐंशी व्या स्थापना दिवस समारोह प्रसंगी सुभाषचंद्र बोस यांचे प्रपौत्र चंद्रकुमार बोस यांच्या कर कलमा द्वारा  ॲड.पुजा प्रकाश एन.यांना "स्टीम्युलेटींग फिलींग ऑफ पॅट्रोटिजम अवार्ड" प्रदान करुन २१ आक्टोबर २०२४ रोजी गौरवान्वित करण्यात आले, सदर कार्यक्रम प्रसंगी सुभाषचंद्र बोस यांचे प्रपौत्र चंद्रकुमार बोस,सौ.उषा चंद्रकुमार बोस, कर्नल जी.डी.बक्षी जयहिंद सैनिक संस्था व सहयोगी संस्था चे प्रतीनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..