कापसेवस्ती शाळेचा दीड महिन्यात बदलला लुक. अग्नीपंखचा आपुलकी मिशन उपक्रम
श्रीगोंदा - अग्निपंख फौंडेशनने लोकसहभागातून अवघ्या 45 दिवसात श्रीगोंदा येथील जिल्हा परिषदेची कापसेवस्ती शाळेचे सुशोभीकरण केले वाचन प्रेरणा दिनाचे दिवशी लोकार्पण करुन मिसाईलमॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना मानवंदना दिली बदललेली शाळा परिसर पाहुन पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. हे लोकार्पण लेखा व वित्त अधिकारी रमेश कासार, गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र , नवनाथ दरेकर, नवनाथ खामकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश कासार यांनी शाळेस पाच हजाराची पुस्तके भेट दिली. यावेळी लोकसहभाग देणाऱ्या देगणीदारांचा अग्नीपंखने सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष कापसे होते. रमेश कासार म्हणाले कि अग्नीपंख फौंडेशनने लोकसहभागातून कापसेवस्ती रुपच बदलून टाकले हे आपुलकी मिशन अंतर्गत हे काम दिशादर्शक ठरणार आहे. पुढील वर्षी कापसे वस्ती शाळेने मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा मध्ये भाग घ्यावा त्या दृष्टीने इतर त्रृटी दुर करुन घ्याव्यात सत्यजित मच्छिंद्र म्हणाले कि कापसेवस्ती शाळेचे काम निस्वार्थ भावनेने झाले अग्नीपंख फौंडेशनच्या टीमने इतर शाळांसाठी काम करावे. प्रास्ताविक श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांनी केले यावेळी अग्नीपंखचे कोषाध्यक्ष प्रा संजय लाकूडझोडे , नवनाथ खामकर, रमेश लाढाणे, निळकंठ बोरुडे, सिताराम भुजबळ, रमेश पाटोळे, सुनीता बोरुडे, दादासाहेब देशमुख, दादासाहेब कोल्हे यांची भाषणे झाली.
यावेळी प्राचार्य बी टी मखरे, डॉ अशोक खेंडके , सुनीता वाजे , वैशाली कापसे, गोपाळराव डांगे, महादू उदार, जनार्दन घोडेकर, मिठू लंके, अनंत दळवी, एकनाथ अंभोरे , संदीप खेतमाळीस, शरद तरटे, सुभाष रसाळ, सुधीर तरटे, आप्पा खामकर, राजेंद्र राऊत उपस्थित होते. आभार राजकुमार इथापे यांनी मानले तर सुत्रसंचलन विशाल चव्हाण यांनी केले.
Comments
Post a Comment